अमृता-प्रसादची लगीनघटिका समीप आली आहे. दोघे आज लग्नबंधनात अडकणार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात या दोघांची पहिली भेट झाली होती. घरात त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच त्यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडाही उरकला. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघेही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. अमृता अभिनेत्री असण्यासोबत आरजेदेखील आहे. 98.3 मिर्चीमराठीवर एफएमवर तिचा 'टॉकरवडी' हा शो आहे.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. बिग बॉसनंतरही अमृता आणि प्रसाद एकमेकांना डेट करत होते. अनेकदा ते सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायचे. आता त्यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत.'बिग बॉस'च्या थीमवर असलेली त्यांची लग्नपत्रिक व्हायरल झाली होती.
अमृताच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांच्या हळदीचा आणि संगीताचा कार्यक्रमही दणक्यात पार पडली या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तसेच आता त्यांच्या लग्नसोहळ्यातही अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे.
अमृता आणि प्रसादने लग्नासाठी एक ओपन रिसॉर्ट बुक केले आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना छान अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. एकंदर त्यांचं लग्न निसर्गाच्या सानिध्यात पार पडणार आहे.