Join us

"लग्नाबाबत सगळ्यात आधी राज ठाकरेंना सांगितलं, कारण...", अंकिता वालावलकरचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:45 IST

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. अंकिताने लग्नाची बातमी सगळ्यात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिल्याचा खुलासा नुकताच केला आहे. 

Bigg Boss Marathi 5: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने बिग बॉस मराठी ५ मधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. कोकणच्या या चेडवाने बिग बॉस मराठीचं घर गाजवलं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या अंकिताने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. बिग बॉस मराठीच्या घरात अंकिताने लग्न करणार असल्याची कबुली दिली होती. आता बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. अंकिताने लग्नाची बातमी सगळ्यात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिल्याचा खुलासा नुकताच केला आहे. 

अंकिताने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये याचा खुलासा केला आहे. "बिग बॉस मराठीच्या घरात तुम्ही पाहिलं असेलच की मी खूप जास्त इमोशनल मुलगी आहे. आमच्य दोघांचे बरेच गुण जुळतात. त्यातील एक म्हणजे आमचे इमोशन्स आणि त्या इमोशन्समधील एक व्यक्ती होती ती म्हणजे राजसाहेब ठाकरे. लग्नाबाबत सगळ्यात आधी आम्ही राजसाहेबांना सांगितलं होतं. या गुढीपाडव्यालाच आम्ही याबाबत राजसाहेबांना सांगितलं होतं. पण, त्यानंतर बिग बॉस आलं आणि गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या", असं अंकिता व्हिडिओत म्हणत आहे. 

अंकिताने काही दिवसांपूर्वीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला. कुणाल भगत असं तिच्या होणाऱ्य नवऱ्याचं नाव असून तो एक संगीतकार आहे. त्याने अनेक मालिका, सिनेमांच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. कुणालच्या सोशल मीडियावर त्याचे अंकितासोबतचे अनेक फोटो आहेत. अंकिता आणि कुणाल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरटिव्ही कलाकारराज ठाकरे