Ankita Walawalkar: 'बिग बॉस मराठी' फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) कायमच चर्चेत येत असते. बिग बॉस संपल्यानंतर अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यात रमलेली पाहायला मिळते आहे. कायम नाती जपणारी अशी तिची चाहत्यांमध्ये ओळख निर्माण झाली आहे. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर अंकिता सोशल मीडियावर पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्सची चाहत्यांसोबत याद्वारे शेअर करते. नुकताच अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
अंकिता वालावलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये अंकिता वालावलकर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टार सोनाली गुरवच्या हळदीला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. सोनाली आणि अंकिता या एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अंकिता लाडक्या मैत्रीणीला शुभेच्छा देताना दिसते आहे. शिवाय सोनाली अंकितामध्ये हळदी समारंभात प्रेमळ संवाद रंगल्याचा पाहायला मिळतोय. अंकिता वालावलकरचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, सोनाली गुरव ही लोकप्रिय रिल स्टार्सपैंकी एक आहे. तिची सोशल मीडियावर तगडी फॅनफॉलोइंग आहे. सोनाली गुरव आणि 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर यांचा अलिकडेच साखरपुडा पार पडला होता. आता लवकर दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.