नववर्षाला सुरुवात झाल्यापासून अनेक कलाकारांनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तर काहींनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत पार्टनरचा चेहरा दाखवला. आता 'बिग बॉस मराठी'मधून घराघरात पोहोचलेल्या आणि प्रसिद्धीझोतात आलेल्या जय दुधाणेनेदेखील त्याच्या लव्ह लाइफबद्दल मोठी अपडेट दिली आहे. जयने त्याच्या पार्टरनचं गुपित उलगडत गुपचूप साखरपुडाही उरकून टाकला आहे.
'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणे त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे. जयने नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. याचे फोटो समोर आले आहेत. जयच्या गर्लफ्रेंडचं नाव हर्षला पाटील असं आहे. त्याने फिल्मी स्टाइलने हर्षलाला प्रपोज केल्याचं फोटोत दिसत आहे. सोशल मीडियावरुन साखरपुड्याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
जय दुधाणे 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये तो चर्चेतील चेहरा होता. 'बिग बॉस मराठी ३'चा तो उपविजेता होता. तर 'MTV स्प्लिट्सविला १३'चा जय विनर होता. त्यानंतर जय मालिकेतही दिसला होता. आता तो लवकरच ऐतिहासिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.