Join us

'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणवर 'पुष्पा' फिव्हर, व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:13 IST

बिग बॉस मराठी ५ (Bigg Boss Marathi 5) फेम सूरज चव्हाण (Suraj Chavan) वर पुष्पा फिव्हर पाहायला मिळाला. रिल स्टार असलेल्या सूरजने पुष्पाच्या डायलॉगचा रिल शेअर केला आहे. त्याच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सध्या सगळीकडे अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा 'पुष्पा २ द रुल' (Pushpa 2 The Rule) या चित्रपटाची चर्चा होताना दिसते आहे. या चित्रपटाला देशभरातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतो आहे. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्स खूप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यावरील रिल्स पाहायला मिळत आहे. दरम्यान बिग बॉस मराठी ५ (Bigg Boss Marathi 5) फेम सूरज चव्हाण (Suraj Chavan) वर पुष्पा फिव्हर पाहायला मिळाला. रिल स्टार असलेल्या सूरजने पुष्पाच्या डायलॉगचा रिल शेअर केला आहे. त्याच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सूरज चव्हाण सोशल मीडियावर रिल बनवून लोकप्रिय झाला आहे. याच जोरावर तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सूरज रिल बनवताना दिसतो. नुकताच त्याचा एक रिल चर्चेत आला आहे, या व्हिडीओत तो पुष्पा २ द रुल सिनेमातील डायलॉग्स बोलताना दिसतो आहे. या व्हिडीओतील त्याची हटके स्टाईल आणि डायलॉग्स बोलतानाचा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. त्याच्या या रिलवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियासूरज चव्हाणच्या पुष्पा सिनेमातील डयलॉग्सच्या रिलवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, गोलिगत सूरज भाऊ किंग. जिंकलास रे भावा. तर दुसऱ्याने लिहिले की, भावा तू पुष्पां बनू नकोस पुष्पां ला आपण झापुकझुपुक करायला लावू. आणखी एकाने लिहिले की, पाहिले तुझी वेळ खराब होती लोक खूप काही बोलून गेले तुला आता दिवस तुझे आहे माहोल करून घे भावा..... एका युजरने म्हटले की, आदर कमावला भाऊंनी आता कोणी तुला वाईट बोलायला दहा वेळा विचार करेल 

सूरज चव्हाण लवकरच झळकणार सिनेमातबिग बॉस मराठी'चा शो गाजवणारा बारामतीचा पठ्ठ्या सूरज चव्हाण आता घराघरात पोहोचला आहे. 'बिग बॉस'च्या घरात आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने त्याने सर्वांची मनं जिंकली. बिग बॉसचा किताब जिंकल्यानंतर केदार शिंदेंनी मोठी घोषणा केली. त्यांनी सूरज चव्हाणला घेऊन नवीन सिनेमा बनवत असल्याचे सांगितले. या सिनेमाचे नाव आहे 'झापुकझुपुक'. सूरजचे चाहते त्याच्या या पहिल्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पारश्मिका मंदानाबिग बॉस मराठी