बिग बॉस मराठी २:  बिग बॉसना घरातील सदस्यांची वाटतेय लाज?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 01:31 PM2019-07-08T13:31:20+5:302019-07-08T13:39:41+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सगळ्यांच्या लाडक्या सुरेखा पुणेकर घराबाहेर पडल्या. आता या आठवड्यामध्ये बिग बॉस सदस्यांना कुठला टास्क देणार? हे बघणे रंजक असणार आहे.

Bigg boss marathi season 2 : Bigg boss feel ashame for this contestants | बिग बॉस मराठी २:  बिग बॉसना घरातील सदस्यांची वाटतेय लाज?

बिग बॉस मराठी २:  बिग बॉसना घरातील सदस्यांची वाटतेय लाज?

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सगळ्यांच्या लाडक्या सुरेखा पुणेकर घराबाहेर पडल्या. आता या आठवड्यामध्ये बिग बॉस सदस्यांना कुठला टास्क देणार ? कोण नॉमिनेट होणार ? प्रेक्षकांची मते कोणाला वाचवणार ? हे बघणे रंजक असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता TOP ९ सदस्य मिळाले आहेत. परंतु आज बिग बॉस जाहीर करणार आहेत, या हे सदस्य TOP ९ ठरले असले तरीदेखील त्याची लाज वाटत आहे, आणि म्हणूनच बिग बॉस सगळे लक्झरी पदार्थ जप्त करत आहेत.” बिग बॉसची अशी घोषणा ऐकून सगळ्या सदस्यांनी बिग बॉसची माफी मागितली. तर घराचा कॅप्टन माधवला आता कुठली शिक्षा मिळेल ? सदस्यांनी नक्की काय केले ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.


 
हिना आणि शिवमध्ये दर आठवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण होतच असते. आज देखील हिना वैशालीला सांगत होती, रुपालीने मला प्रश्न विचारला आणि मी माईक न घालताच उत्तर दिले. त्यावर वैशाली म्हणाली, यासाठी बिग बॉस तुला ओरडले. ती असे देखील म्हणाली, “जी लोक कधीच चुका करत नाहीत, ती माईक विसरायला लागली आहेत,... त्यावर शिव देखील म्हणाला, “बापरे माईक विसरलं कोणीतरी.”  त्यावर हिनाने शिवला सांगितले तू बोलू नकोस ... शिव म्हणाला तुझ्याशी नाही मी वैशाली ताईशी बोलत आहे, तू उगाच भांडणाच्या मूड मध्ये नको राहत जाऊस, तू कोण मला सांगणारी बोलू नकोस”. हिनाने त्यावर शिवला उत्तर दिले, कारण माझ्याबद्दल हा विषय सुरु आहे, आणि मला नाही आवडत तू बोलतो माझ्याबद्दल”. आणि शब्दाला शब्द वाढतच गेला. आता बघूया हा वाद पुढे कुठपर्यंत जातो ?

Web Title: Bigg boss marathi season 2 : Bigg boss feel ashame for this contestants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.