Join us

Bigg Boss Marathi 3 Episodes, 1oct: मला साथ देशील का ? विकासच्या प्रश्नावर काय असेल गायत्रीचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 13:16 IST

Bigg boss marathi 3:नव्या कॅप्टन्सी टास्कसाठी दोन उमेदवारांमध्ये नवा सामना रंगल्याचं पाहायला मिळणार आहे.  त्यामध्येच विकास आणि गायत्री यांच्यामधील संवाद प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. 

ठळक मुद्देआजच्या (१ ऑक्टोबर) विकास आणि गायत्री चर्चा करताना दिसणार आहे.

बिग बॉस मराठी हा शो घरातील चित्रविचित्र टास्क, भांडणं आणि यातील प्रेम प्रकरणं यांमुळे कायमच चर्चेत असतो. आतापर्यंत झालेल्या दोन्ही पर्वामध्ये घरातील वाद आणि प्रेम प्रकरणं गाजली होती. त्यानंतर आता या पर्वातदेखील असंच काहीसं चित्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच काल (३० सप्टेंबर) झालेल्या हल्लाबोल या टास्कमध्ये टीम B वर मात टीम A ने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता घरातील नव्या कॅप्टन्सी टास्कसाठी दोन उमेदवारांमध्ये नवा सामना रंगल्याचं पाहायला मिळणार आहे.  त्यामध्येच विकास आणि गायत्री यांच्यामधील संवाद प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. 

'हल्लाबोल' टास्कमध्ये टीम A विजयी ठरल्यानंतर यामधूनच कॅप्टन्सी कार्यासाठी दोन  उमेदवार निवडण्याचे आदेश बिग बॉसने विजेत्या टीमला दिले आहेत. त्यामुळे विजेत्या टीमने विचारविनिमय केल्यानंतर जय आणि गायत्री या दोघांची नावं नव्या टास्कसाठी निवडली आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये खुलजा सिमसिम हे कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. परंतु, त्यापूर्वी हे दोघंही घरातल्यांची मनं बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.

करण सिंह ग्रोवरची पहिली पत्नी दिसते बिपाशाइतकीच सुंदर;  घटस्फोटानंतर लूकमध्ये झालाय कमालीचा बदल

आजच्या (१ ऑक्टोबर) विकास आणि गायत्री चर्चा करताना दिसणार आहे. "हल्लाबोल या टास्कमध्ये जे घडलं ते आपण पहिलंच. आहे, “जर मी कॅप्टन बनले तर जयपेक्षा जास्त निष्पक्ष राहू शकते. जयपेक्षा जास्त शांतता मी घरात ठेऊ शकते. टास्कच्या वेळी झालेला आरडाओरडा आणि मारामारी होणार नाही. तसंच फेरप्ले मी करू शकते असं मला वाटतं. जर तू मला पाठिंबा दिलास, तर मला वाटतं ही आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल. जे काही घडलं त्याच्यानंतर ही एक चांगली सुरुवात असेल. माझ्या डोक्यात काही नाही तुझ्या डोक्यात काही नाही”,असं गायत्री विकासला सांगते. 

गायत्रीचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर विकासने तिला सांगताना दिसणार आहे, “जर अशी कुठली वेळ आली आणि मला तुझी गरज लागली as a captain तर तू मला साथ देशील का ? गायत्री त्याला सांगणार आहे माझ्याकडे असं कोणीच अजून तरी मागितलेलं नाहीये तर मी नक्की प्रयत्न करेन तसं करण्याचा”.

दिवसेंदिवस 'फॅण्ड्री'तील शालू होतीये आणखीनच बोल्ड; पाहा Photos 

दरम्यान, गायत्री आणि विकास यांच्यात झालेल्या चर्चेनंतर टास्क खेळताना कोणता स्पर्धक एकमेकांना मदत करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीगायत्री दातारटिव्ही कलाकार