Join us

Abhijeet Sawant : "चला एक बाई, तिचं चाललंय पण बाकीचे लोक..."; अभिजीतने टोचले इतरांचे कान, बनवला ग्रुप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 6:04 PM

Bigg Boss Marathi Season 5 And Abhijeet Sawant : गायक अभिजीत सावंत याने इतरांचे कान टोचले आहेत. इतरांना सल्ला देत असतानाच अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर आणि  धनंजय पवार यांचा ग्रुप झाल्याचं पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक अवली सदस्य सहभागी झाले आहेत. अवघ्या दोन दिवसांतच स्पर्धकांनी आपला ग्रुप बनवायचा प्रयत्न सुरू केला आहे. अशातच गायक अभिजीत सावंत याने इतरांचे कान टोचले आहेत. इतरांना सल्ला देत असतानाच अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर आणि  धनंजय पवार यांचा ग्रुप झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरातील बॉशरुममध्ये अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पवार आणि पुरूषोत्तमदादा पाटील हे चर्चा करत आहेत. यावेळी अंकिता "आपण आता जर सगळे एकत्र आहोत तर आपला ग्रुप आपण शंबर टक्के बनवू. पण तुम्ही जर म्हणाल की, त्याला मुद्दाम टार्गेट करू तर तसं नको" असं म्हणते. त्यावर अभिजीतने "चला एक बाई, तिचं चाललंय पण बाकीचे लोक काय करताहेत. आहात कुठे तुम्ही? ही काय पिकनिक थोडी आहे?" असं म्हणत सर्वांना वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

"अरबाज मला आता एक चांगली गोष्ट म्हणाला, हे बघा तुम्ही एकट्याने गेम जिंकू शकत नाही. तुम्ही एकट्याने निर्णय घेऊ शकता. एक साधी गोष्ट होती... निर्णय घेणं तुमच्या हातात ठेवा. तुम्ही आपल्या लोकांना तुमचा विश्वास दाखवा. तुम्ही एकमेकांमध्येच विश्वास तयार केला नाही. तुम्ही दुसऱ्यांसोबत काय लढणार?, प्रयत्न तर करा. चला एक बाई, तिचं चाललंय पण बाकीचे लोक काय करताहेत. आहात कुठे तुम्ही? ही काय पिकनिक थोडी आहे?" असं अभिजीत सावंतने म्हटलं आहे. 

"मी नसतो कोणालाच भीत, मीच आहे गुलीगत टॉपचा किंग"

सूरज चव्हाणने विशेष प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आता मात्र तो कोणालाही न घाबरता हटके स्टाईलने सर्वांना गोलीगत चीत करताना दिसून येणार आहे. प्रोमोमध्ये सूरज निक्की तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येत आहे. त्यावर निक्की तांबोळी सूरजला म्हणते,"तू मला चॅलेंज करतोस ना... तू विचार पण करू शकत नाही की तू माझं असं रुप पाहशील". त्यानंतर कन्फेशन रुममध्ये 'बिग बॉस' सूरजला बोलावतात आणि म्हणतात, "सूरज न घाबरता खेळा". यानंतर सूरजलाही मोठा धीर मिळाला आणि त्याने निर्भीडपणे "मीच आहे आता गुलीगत टॉपचा किंग" असं म्हटलं आहे. 

टॅग्स :बिग बॉसअभिजीत सावंतटिव्ही कलाकार