Join us  

अंकिता घराबाहेर जाणारच्या घोषणेनंतर अभिजीत निक्कीला म्हणाला, "मी संपलो..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 3:16 PM

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता 'बिग बॉस मराठी'च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर घराबाहेर पडली आहे.

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता 'बिग बॉस मराठी'च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) घराबाहेर पडली आहे. दरम्यान आजचा भाग खूपच रंगतदार असणार आहे. एकीकडे घरात आज कठीण टास्क पार पडणार आहे. तर दुसरीकडे घरातील काही सदस्य एकमेकांकडे एकमेकांबद्दलचं गॉसिप करताना दिसणार आहेत. अभिजीत (Abhijeet Sawant) आर्याबद्दलचं त्याचं मत अंकिताकडे मांडताना दिसणार आहे. तर निक्की (Nikki Tamboli) अंकिताला अभिजीतबद्दल सांगताना दिसून येणार आहे.

निक्की अंकिताला म्हणते की,"माझ्यावरुन जास्त विश्वास अभिजीतचा तुझ्यावर आहे. कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही दोघं सोबत आहात. आमची फ्रेडशिप असली तरी त्याचं तुझ्यासोबत एक वेगळं कनेक्शन आहे. काल तू घराबाहेर जाणार असल्याची घोषणा केली तेव्हा अभिजीत म्हणाला होता की, मी संपलो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्यावरुन वरचा दर्जा तो तुला देतो. त्याला तुझी गरज आहे". 

अभिजीत अंकिताला म्हणतोय,"मी तुला एक सांगतो. आर्याचं मी मनोरंजन करत बसणार नाही". त्यावर अंकिता म्हणते,"मी आर्याला स्वत: सांगितलं आहे ज्या लेव्हलपर्यंत मी तुला समजावू शकते तिथपर्यंत मी समजावणार. पण त्यापुढे नाही". यावर अभिजीत म्हणतो,"आर्याला उगाच आपण भाव देतोय. ज्याचा काही अर्थच नाही. ग्रुपमध्ये आर्याची किंमत काय हे सर्वांना माहिती आहे". 

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत सावंत