Join us  

"त्याच्या पतंगाची दोरी तिनं तोडली...", अरबाज पटेल घराबाहेर पडताच मराठी अभिनेत्याची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:07 PM

अरबाज पटेलला सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे त्याचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपला असून तो एलिमिनेट झाला.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची सध्या प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा रंगताना दिसते आहे. दिवसेंदिवस 'बिग बॉस'च्या घरात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकतीच आठव्या आठवड्यामध्ये 'बिग बॉस'च्या घरात  एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, अरबाज पटेलला सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे त्याचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपला असून तो एलिमिनेट झाला. अरबाज पटेल घराबाहेर पडताच सोशल मीडियावर अभिनेता अभिजीत केळकरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. 

अभिनेता अभिजीत केळकरसोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच व्यक्त होताना दिसतो. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वामध्ये तो सहभागी झाला होता. नुकतीच त्याने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अभिजीतने अरबाज पटेलवर निशाणा साधला आहे. अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहलंय, "त्याच्या पतंगाची दोरी तिनं कापली.." असं लिहित त्याने त्यासोबत हसण्याचे इमोजी देखील अ‍ॅड केले आहेत.

दरम्यान, बिग बॉसमध्ये आठव्या आठवड्यात वैद्यकीय कारणास्तव संग्राम चौगुले घराबाहेर पडला. त्यानंतर काल रविवारी घरात दुसरं एलिमिनेशन पार पडलं. अरबाज पटेलला सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे त्याचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपला आणि एलिमिनेट झाला. कॅप्टन म्हणून एलिमिनेट होणारा अरबाज हा पहिला स्पर्धक असून 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं. 

टॅग्स :अभिजीत केळकरबिग बॉस मराठीसेलिब्रिटीसोशल मीडियासोशल व्हायरल