Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये रोजच स्पर्धकांमध्ये राडा पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळी सध्या घराची कॅप्टन आहे. अशातच आता घरामध्ये मानकाप्याची एन्ट्री झाली आहे. हे एक नॉमिनेशन टास्क असून स्पर्धक कोणाकोणाला नॉमिनेट करणार हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. तसेच स्पर्धकांच्या जोड्याही बनवण्यात आल्या आहेत. हे सुरू असतानाच आता घरात सासू-सुनेची धमाल पाहायला मिळत आहे.
गुलीगत फेम सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू-वालावलकर यांच्यातला संवाद सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉसच्या घरात वर्षा उसगावकर काम करत असतात. त्यावेळी सूरज चव्हाण त्यांना म्हणतो की, "आई, या वहिनीला हे काम सांग." त्यावर अंकिता सूरजला म्हणते, "ओ भावोजी गप बसा, दिलेलं काम करा, तुम्ही तुमची ड्यूटी सांभाळा... आम्ही आमची ड्यूटी सांभाळतोय. लावलं की नाही सासूबाईंना कामाला..."
वर्षा उसगावकर त्यावर म्हणतात, "आता मी लावणार आहे सूनबाईंना कामाला..." त्यावर अंकिताने "माझी मर्जी, हे माझं घर आहे" असं उत्तर दिलं. "माझी मर्जी चालणार नाही, सासूच ऐकावं लागणार" असं सूरजने अंकिताला सांगितलं. त्यावर वर्षा उसगावकर यांनी "मी माझ्या मर्जीने काम करत आहे. मला कोणी कामाला लावलेलं नाही असं सांगितलं." य़ानंतर अंकिताने "कळलं का भावोजी... तुम्ही तुमची ड्यूटी सांभाळा. उगाच इकडे तिकडे तोंड करत बसू नका..." असं सूरजला म्हटलं.
पंढरीनाथ कांबळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत "भावोजी भावोजी मिठाचा खोका, भावोजींच्या मिशीवर बसला बोका" हे गाणं म्हटलं आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसतसे स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येत आहेत. घरातील समीकरणं देखील बदलताना दिसत आहेत. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये दोन ग्रुप झाले होते. भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीसमोर टीम A ची पोलखोल केली. ग्रुप A मधील सदस्य निक्कीच्या मागे तिला नेमकं काय म्हणतात याच्या काही क्लिप्स निक्कीला चक्रव्यूहमध्ये दाखवण्यात आल्या. हे पाहून निक्कीला धक्काच बसला.