Join us  

वर्षा अन् निक्कीसह 'हे' सदस्य झाले नॉमिनेट; कोण होणार घराबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:20 PM

नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेश टास्क पार पडला. यावेळी चार सदस्य हे नॉमिनेट झाले आहेत. 

Bigg Boss Marathi Season ५ : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. २८ जुलैपासून सुरू झालेलं 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या पर्वातील स्पर्धकांनी पहिल्या दिवसापासूनच स्वतःची रणनीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉस मराठीने आता खेळाच्या पाचव्या आठवड्यात प्रवेश केला आहे.  नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेश टास्क पार पडला. यावेळी चर्चेत असलेले चार सदस्य हे नॉमिनेट झाले आहेत. 

'बिग बॉस'च्या घरात  मानकाप्याची एन्ट्री झाल्यानंतर  'बिग बॉस'ने घरात आर्या- अरबाज, अभिजीत-निक्की, अंकिता- वर्षा, सुरज- जान्हवी, वैभव-धनंजय, पॅडी-घनश्याम अशा जोड्या घालून दिल्या आहेत. 'बिग बॉस'ने घरातील सर्व सदस्यांना एकटं फिरायचं नाही. संपुर्ण आठवडाभर सर्वांना नेमून दिलेल्या जोडीदाराबरोबर राहावं लागेल, असा सक्तीचा हुकूम दिला. 

नॉमिनेश टास्कमध्ये जोड्यांना गुप्त पद्धतीने नॉमिनेट करण्यात आलं. यात अंकिता वालावलकर,-वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी-अभिजीत सावंत या दोन जोड्या नॉमिनेट झाल्या. परंतु यात एक मोठा ट्विस्ट असणार आहे.  दर आठवड्यात नॉमिनेशन जाहीर झाल्यावर व्होटिंग लाइन्स ओपन होतात. पण, या आठवड्यात वोटींग लाइन्स बंद आहेत. त्यामुळे या आठवड्यात कोणीही घराबाहेर जाणार नाही. 'बिग बॉस मराठी'च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत.    

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीवर्षा उसगांवकरअभिजीत सावंत