Join us  

'बिग बॉस'मधून एक्झिट घेताच अरबाज पटेलची पहिली पोस्ट, नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 9:00 AM

घराबाहेर पडताच अरबाजने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

Bigg Boss Marathi Arbaz Patel : 'बिग बॉस मराठी'ची सध्या खूपच चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात या आठवड्यातील एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी  निक्की, अरबाज, वर्षा, सूरज आणि जान्हवी हे सदस्य नॉमिनेट होते. या सदस्यांपैकी कमी मते पडल्याने अरबाजचा प्रवास संपला असून तो या आठवड्यात घराबाहेर पडला आहे. कॅप्टन असून घरातून एलिमिनेट होणारा अरबाज हा 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील पहिलाच सदस्य ठरला आहे. घराबाहेर पडताच अरबाजने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

'बिग बॉस'च्या घरात अरबाज आणि निक्कीने एकत्र प्रवेश केला होता,  पहिल्या दिवसापासून त्यांची जोडी जमली होती. एवढचं काय तर अरबाजला निक्कीच डोरमॅट ही संबोधण्यात आलं. मात्र, दोघांची मैत्री तुटली नाही. एकसोबत फिनालेमध्ये जायचं असंही दोघांनी ठरवलं होतं. पण, फिनालेआधीच अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागला असल्याचं पाहायला मिळतंय. आरबाजचं एलिमिनेश हे निक्कीसाठी अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. त्यामुळे निक्की प्रचंड भावुक झाली होती. एरवी कचाकचा भांडणारी निक्की ही  ढसाढसा रडताना दिसून आली. 

अरबाजने घराबाहेर जाताना "सगळी भांडणं विसरून निक्कीला साथ दे… ती आता एकटी आहे”"अशी विनंती जान्हवीला केली. घराबाहेर आल्यानंतर आरबाजने एक पोस्ट शेअर केली आहे.  यामध्ये त्याने निक्कीसोबतचे भावुक फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये त्याने हार्टब्रेक आणि कोमजलेल्या फुलाचा इमोजी शेअर केलेत. विशेष म्हणजे या पोस्टला अरबाजने 'शेरशाह' चित्रपटातील 'रांझा' हे गाणं लावलं आहे. याशिवाय अरबाजने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटी