Join us  

Bigg Boss Marathi Season 5: निक्की थेट फिनालेमध्ये पोहोचली; अरबाज म्हणतो, "आता आपण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 9:57 AM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: निक्कीला फिनालेपर्यंत पोहोचलेलं पाहून अरबाज पटेलने आनंद व्यक्त केला आहे.

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा आता शेवटचा आठवडा सुरु आहे. काल झालेल्या टास्कमधून निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) तिकीट टू फिनाले पटकावले आहे. सूरज चव्हाणला हरवत ती फिनालेपर्यंत पोहोचली. तर बाकी ६ सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. त्यातील काही सदस्यांचं मीड वीक एलिमिनेशनही होणार असल्याची माहिती बिग बॉसने दिली. दरम्यान निक्की फिनालेपर्यंत पोहोचल्यानंतर अरबाज पटेलची (Arbaz Patel) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

बिग बॉसच्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जोडी खूप गाजली. दोघांनी मिळून एकापेक्षा एक टास्क जिंकले. दोघांनी फिनालेपर्यंत पोहोचायचं असाच त्यांचा प्रयत्न होता. मात्र कमी मतांमुळे अरबाजला दोन आठवड्यांपूर्वी घराबाहेर जावं लागलं होतं. आता निक्की फिनालेपर्यंत गेल्याने अरबाजने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. त्याने निक्कीचा फोटो शेअर करत लिहिले, 'अभिनंदन निक्की, आता आपण ट्रॉफीपासून जास्त दूर नाही'.

६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठी 5 चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. रितेश परदेशात असल्याने गेल्या दोन आठवड्यात भाऊचा धक्का झाला नाही. आता थेट ग्रँड फिनालेसाठीच रितेश हजेरी लावणरा आहे. सध्या घरात निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत आणि जान्हवी किल्लेकर हे सदस्य राहिले आहेत. निक्की सोडून बाकी सर्व नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात मध्येच कोण घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीसोशल मीडिया