Join us

'सिंगल' की 'कमिटेड' ? रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर अरबाज पटेलने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 2:19 PM

 नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात  रॅपिड फायर राऊंडदरम्यान अरबाज पटेलनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सर्वात मोठा खुलासा केला. 

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस' हा असा शो आहे, जो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी सदस्यांच्या वक्तव्यामुळे, कधी त्यांच्यातील भांडणामुळे, कधी बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे.  'बिग बॉस मराठी'चा पाचवं पर्व चांगलेच चर्चेत आहे.  एकामागोमाग एक नवे ट्विस्ट रोज 'बिग बॉस'च्या घरात सदस्यांना मिळत आहेत. त्यामुळे हे पर्व खऱ्या अर्थाने रोमांचक होत चालले आहे.  नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात  रॅपिड फायर राऊंडदरम्यान अरबाज पटेलनं  (Arbaz Patel)त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सर्वात मोठा खुलासा केला. 

'बिग बॉस'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच अरबाज आणि निक्की (Nikki Tamboli) यांच्यात  प्रेमाचे वारे वाहताना दिसले. दोघेही एकमेंकांसोबत फ्लर्ट करताना पाहायला मिळाले. इतकेच नाही तर अरबाजने निक्की तांबोळीला इम्प्रेस करण्यासाठी टोमॅटोचा हार्ट बनवला होता. पण, त्याचं हे प्रेम निव्वळ नाटक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. कारण, नुकतंच 'बिग बॉस'च्या रविवारीच्या एपिसोडमध्ये मोठा खुलासा झाला आहे. अरबाज पटेलनं तो 'कमिटेड' असल्याचं सांगितलं. 

'बिग बॉस'च्या घरात 'कलर्स मराठी' वाहिनीवर सुरु होत असलेल्या नवीन मालिकेतील प्रमुख कलाकार घरात आले होते. रुमानी खरे, शिल्पा नवलकर, अंबर गणपुळे या तिघांनीही घरातल्या सदस्यांबरोबर एक खास टास्क खेळला. यावेळी मालिकेतील दुर्गाने म्हणजे रुमानी खरेनं घरातल्या पुरुष सदस्यांबरोबर रॅपिड फायर राऊंड घेत अनेक प्रश्न विचारले. रॅपिड फायर राऊंडदरम्यान दुर्गाने अरबाजला पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे, 'या घरात तुम्हाला सर्वात जास्त काय महत्वाचं वाटतं? प्रेम की गेम?' त्यावर अरबाज म्हणाला, 'गेम... कारण प्रेम करून बघितलं, पण ते गेमसारखंच वाटतंय. त्यामुळे आता मी माझा गेम दाखवणार'.

यानंतर दुर्गाने अरबाजला दुसरा प्रश्न विचारला. 'सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय आणि त्याचं खरं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही सिंगल आहात की कमिटेड?' त्यावर एका सेकंदाचाही वेळ न दवडता अरबाजने तो 'कमिटेड' असल्याचं सांगितलं. आता याचा अरबाज-निक्कीच्या मैत्रीवर काय परिणाम होणार ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात येण्याआधी अरबाजने एका मुलाखतीमध्ये लीझा बिंद्राबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं.

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीमराठी अभिनेताकलर्स मराठी