Join us  

Bigg Boss Marathi Season 5: मैत्रीचा त्रिकोण? अभिजीतच्या मनात निक्कीसाठी सॉफ्ट कॉर्नर, अरबाजचा राग अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 9:01 AM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: निक्की आणि अभिजीतची मैत्री, घरातील इतर सदस्यांना खटकली

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा सध्या चौथा आठवडा सुरु आहे. घरात  ए टीम आणि बी टीम झाली असल्याने त्यांच्यात सतत खटके उडत आहेत. दरम्यान यात एक वेगळाच ट्विस्ट आल्याचंही पाहायला मिळत आहे. सध्या निक्की (Nikki) , अभिजीत (Abhijeet) आणि अरबाज (Arbaz)  यांच्यात त्रिकोण पाहायला मिळतोय. हा प्रेमाचा नाही तर मैत्रीचा त्रिकोण आहे. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकतेय. त्यामुळे आता अरबाजनेही थेट अल्टीमेटमच दिला आहे. नक्की काय प्रकार आहे वाचा. 

अरबाज आणि निक्की ए टीम चे सदस्य आहेत. तर अभिजीत हा बी टीमचा सदस्य आहे. अभिजीतच्या मनात निक्कीसाठी मात्र फारच सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसतंय. अभिजीत त्याच्या टीम मेंबर्ससमोर निक्की बाबतीत  एक वागतो तर निक्की समोर असताना भलतंच वागतो. तर निक्की सुद्धा अभिजीतच्या विरोधात कमीच जाते. याचा राग आता बी टीमलाही येतोय आणि अरबाजलाही येतोय. नवीन आलेल्या प्रोमोमध्ये अरबाजने थेट अल्टीमेटमच दिला आहे. 'अभिजीत समोर असेल तर तू मध्ये बोलू नको. मी आता बैल झालोय, कोणालाही जाऊन भिडेन' असं तो अंकिताला सांगतोय.  या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे, "तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला". निक्की पुढे अभिजीतला म्हणते,"त्याचं म्हणणं हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?"

निक्की आणि अरबाज यांच्यात अभिजीतमुळे दुरावा येतो का हे कळेलच. दरम्यान या आठवड्यात चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आर्या, इरिना, अभिजीत आणि वैभव हे काल नॉमिनेट झाले. या रविवारी कोण घराबाहेर जाणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत सावंतसोशल मीडियाटेलिव्हिजन