Join us

Bigg Boss Marathi 5 : बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्यांमध्ये जोरदार राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 10:29 AM

Bigg Boss Marathi Season 5 :'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात सदस्य बी बी फार्ममध्ये राडा होताना दिसणार आहे. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगलाच कल्ला करणार आहेत.

बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi Season 5 :) घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. घरात नेहमीच रंगतदार टास्क पार पडत असतात. सदस्यांसाठी यंदाचा आठवडा खूपच कठीण आहे. या आठवड्यात घरात अनेक कठीण टास्क पार पडणार आहेत. पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम A’ आणि ‘टीम B’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. परंतु, गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. आज बीबी करन्सीसाठी BB फार्ममध्ये सदस्य जोरदार राडा होताना दिसणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात सदस्य बी बी फार्ममध्ये राडा होताना दिसणार आहे. बीबी फार्ममधून जास्तीत जास्त दूध गोळा करताना चांगलाच कल्ला करणार आहेत. कोणती टीम बीबी फार्ममधून दूध गोळा करण्यात बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या टास्कमध्ये घरातील सर्वच सदस्य जोरदार राडा करताना दिसणार आहेत. त्यांचा हा राडा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

सात स्पर्धक झालेत नॉमिनेट'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या सात जणांमध्ये घराबाहेर कोण जाणार? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी