Join us  

Bigg Boss Marathi Season 5: "पण कोणी वाकड्यात गेले तर...", पुण्याच्या निखिल दामलेनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 6:31 PM

Bigg Boss Marathi Season 5 : 'रमा राघव' या मालिकेतून राघवच्या भूमिकेतून अभिनेता निखिल दामले घराघरात पोहचला. सध्या हा अभिनेता'बिग बॉस मराठी'च्या घरात पाहायला मिळतो आहे.

कलर्स मराठीच्या 'रमा राघव' या मालिकेतून राघवच्या भूमिकेतून अभिनेता निखिल दामले घराघरात पोहचला. सध्या हा अभिनेता'बिग बॉस मराठी'च्या घरात पाहायला मिळतो आहे. पुण्याचा हा गुणी अभिनेता नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडत आला आहे आणि आता 'बिग बॉस'च्या घरात तो आपल्या अनोख्या अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे.

मालिका आणि 'बिग बॉस'मधील प्रवासाबद्दल निखिल म्हणाला,"मालिका आणि 'बिग बॉस'मधील प्रवास सारखाच वाटतो. माझ्या मते मालिकेतही हिरो आणि खलनायक असतात आणि तसंच 'बिग बॉस'च्या घरातही हिरो आणि खलनायक असतात. त्यामुळे हा प्रवास मला खूप समान वाटतो. जेव्हा मी माझ्या  घरच्यांना बिग बॉस बद्दल सांगितले तेव्हा त्यांना माझा खूप अभिमान वाटला आणि ते 'बिग बॉस' मध्ये मला पाहायला खूप उत्साहित आहेत. माझी आई तशी बिग बॉसची खूप मोठी फॅन आहे, तर कामामुळे बाबांना फारसा वेळ मिळत नाही. तरी ते दोघेही खूप उत्सुक आहेत. घरातल्या कामाबद्दल बोलायचे झाले तर.. मला भांडी घासायला कंटाळा येतो. जेवणाबद्दल सांगायचे तर मला जास्त बनवता येत नाही पण बाकी सगळी कामे करायला मला आवडेल". 

निखिल पुढे म्हणाला की ,"माझ्या मित्रांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी मला सल्ला दिला की, तू जसा बाहेर आहे तसाच घरातही राहा.. कारण तेवढंच पुरेसं आहे तुला बिग बॉसची ट्रॉफी जिंकायला. घरात जाण्याआधी मी शेवटचा कॉल माझ्या घरच्यांना केला. कारण पहिल्यांदाच मी 100 दिवस त्यांच्यापासून लांब राहणार आहे.. पण माझे काही निश्चित विचार आहेत. "जो माझ्याशी नीट आहे त्याच्याशी मी नीट राहीन, पण कोणी वाकड्यात गेले तर मग मी पण थांबणार नाही," असे  निखिलने स्पष्ट सांगितले आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठी