Join us  

नोकरी, रिजेक्शन अन् मुंबईत टिकण्यासाठी धडपड; 'कोकण हार्टेड गर्ल'चा थक्क करणारा प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 4:45 PM

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवसापासूनच 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकर तिच्या दमदार खेळीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते आहे.

Ankita Walawalkar Journey: सध्या मनोरंजन विश्वात 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची तुफान चर्चा रंगली आहे. या शोच्या पहिल्या दिवसापासूनच 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकर तिच्या दमदार खेळीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते आहे. अंकिताने कोकणातील बोलीभाषा, तिथलं घर, बाग, निसर्गसौंदर्याचा वापर करून अनेक व्हिडीओ बनवत सोशल मीडियावर आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. पण, अंकिताचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री करण्याआधी अंकिताने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये 'कोकण हार्टेड गर्ल'ने तिची संघर्ष कहाणी सांगितली. दरम्यान, मुलाखतीत अंकिता म्हणाली,"तेरा हजार पगार असलेल्या नोकरीसाठी मी नालासोपारा ते कामोठे इतक्या लांबचा प्रवास करायचे. मला पार्ट टाईम जॉब मिळावा यासाठी मी 'डॉमिनोझ' मध्ये जाऊन एक इंटरव्ह्यू दिला होता. तो माझ्यासाठी एक विचित्र अनुभव आहे. एक वेळ अशी आली होती जेव्हा की मला वाटतं होत की आता मी मुंबईत टिकू शकणार नाही. उपाशी राहायचं त्यात ट्रेनचा पास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घराचं भाडं हे सगळं तेरा हजार रुपयांमध्ये अॅडजस्ट करायचं होतं". 

रिजेक्शनचाही केला सामना-

पुढे अंकिता म्हणाली, "ज्या रिजेक्शन मला जास्त त्रास झाला तो म्हणजे एका क्लासेसमध्ये टिचर म्हणून मी इंटरव्ह्यू् द्यायला गेले होते. तिथ् मला मुलांना मॅथ्स शिकवायचं आहे, असं सांगितलं. पण, तेव्हा त्यांनी मला रिजेक्ट केलं. आमदारकीचं तिकिट वगैरे सगळ्या गोष्टी करून पाहिल्या होत्या. हे सगळं वाटतं तितकं सोप नाही आहे. याशिवाय मुंबईत स्वत: चं घर बनवणं हे देखील तेवढं सोप नाही".

अंकिता वालावलकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. अंकिता वालावलकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक व्हिडीओचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.  

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरबिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया