Join us  

"आप्पाचा विषय लई हार्ड ए", ट्रेंडिंग रॅप सॉंगवर 'परदेसी गर्ल' चा भन्नाट डान्स; इरिनाचा स्वॅग पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 1:36 PM

'बिग बॉस मराठी' फेम इरिना रुडाकोवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 

Irina Rudakova Viral Video : सोशल मीडियाच्या जगतात कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या इंटरनेटवर 'आप्पाचा विषय लई हार्ड ए...'  हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना या ट्रेंडिंग रॅप सॉंगने अक्षरश: वेड लावलंय.  अगदी रातोरात हे गाणं लोकप्रिय झालं आहे. या गाण्यावर वयोवृद्धांपासून तरुणमंडळीही रिल्स व्हिडीओ बनवताना दिसत आहे. अशातच 'बिग बॉस मराठी' फेम इरिना रुडाकोवाने या गाण्यावर एक रिल शूट केल्याचं पाहायला मिळतंय. 

'परदेसी गर्ल' इरिनाने या 'आप्पाचा विषय लई हार्ड ए' या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तसेच हावभावसहित इरिना या ट्रेंडिग गाण्यावर ठुमकताना दिसत आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. इरिनाचा व्हायरल होणारा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. 

निळ्या रंगाची साडी आणि त्यावर साजेसे दागिने असा पारंपरिक साज तिने केला आहे. शिवाय इरिनाने केस मोकळे सोडून त्यामध्ये गजरा देखील माळला आहे. 'परदेसी गर्ल'च्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा सुरू झाला आहे.  या शोच्या चौथ्या आठवड्यामध्ये एविक्शन पार पडलं. या एविक्शनमधून 'परदेसी गर्ल'  इरिना रुडाकोवा घराबाहेर गेली. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील इरिनाचा प्रवास थांबला.

टॅग्स :बिग बॉस मराठीसोशल मीडियासोशल व्हायरल