Join us  

Bigg Boss Marathi Season 5: हिंदी बिग बॉस गाजवलं, कोरोनात छोट्या भावाला गमावलं; निक्की तांबोळीविषयी या गोष्टी माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 2:10 PM

Bigg Boss Marathi Season 5 contestants: आजीच्या निधनानंतर १४ दिवसात भावाचा झाला मृत्यू, निक्की तांबोळीविषयी जाणून घ्या

Bigg Boss Marathi Season 5: अभिनेत्री निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) नुकतंच मराठी बिग बॉसमध्ये एन्ट्री केली आहे. याआधी तिने हिंदी बिग बॉस सीझन १४ गाजवलं होतं. या शोमध्ये ती तिसरी रनर अप ठरली होती. आता मराठी बिग बॉसमध्येही तिची चर्चा आहे. निकी हिंदी नसून मूळची मराठी कुटुंबातलीच आहे. तिचा जन्म छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. नंतर ती कुटुंबासह डोंबिवलीत आली. हिंदी बिग बॉसनंतर 2021 साली तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

२०२१ साली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निक्की तांबोळीच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. आधी तिच्या आजीचं कोरोनामुळे निधन झालं. यानंतर १४ दिवसांनी तिच्या लहान भावाचंही कोरोनामुळे निधन झालं. तिचा भाऊ जतीन अगदी लहान वयात जग सोडून गेला. त्याला न्यूमोनिया आणि ट्युबरक्युलॉसिस असताना कोरोनाचं निदान झालं होतं. त्याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. निक्कीच्या वडिलांनी आधी आई आणि काही दिवसात लेकालाही गमावल्याने ते मोठ्या धक्क्यात होते. हे दु:ख निक्कीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहून शेअर केलं होतं. 

निक्की तांबोळीच्या कुटुंबासाठी ते दिवस साहजिकच खूप कठीण होते. पोटच्या तरुण लेकाला गमावण्याचं दु:ख खूप मोठं आहे. निक्कीने भावासोबत सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते. भावाच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त तिने रक्षाबंधनाची आठवण देणारा फोटो शेअर केला होता.

निक्की तांबोळीने हिंदी बिग बॉसनंतर 'खतरो के खिलाडी'मध्येही सहभाग घेतला गहोता. याशिवाय कलर्सवरील 'खतरा खतरा' शो मध्येही ती दिसली होती. सोशल मीडियावर निक्कीची खूप चर्चा असते. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीमराठी अभिनेताटेलिव्हिजनपरिवार