Join us  

"तुम्ही माझ्या काळजात आयुष्यभर राहणार..." पॅडी कांबळे घराबाहेर पडताच सूरज झाला भावुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:28 PM

'बिग बॉस मराठी'मध्ये काल झालेल्या भाऊच्या धक्यावर पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेला घराबाहेर जावं लागलं.

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'मध्ये काल झालेल्या भाऊच्या धक्यावर पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेला घराबाहेर जावं लागलं. फिनालेला अगदी काही दिवस उरले असताना झालेल्या या एलिमिनेशमुळे प्रेक्षकांना धक्काच बसला. ६५ दिवस आपल्या रंगतदार खेळीमुळे विनोदवीर पॅडी 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहिले. परंतु कमी वोटिंग्समुळे त्यांचा प्रवास इथेच थांबला. या पर्वामध्ये इतर सदस्यांप्रमाणे पॅडी कांबळे आणि सूरज चव्हाणच्या मैत्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मित्राची खंबीरपणे साथ देणारा पॅडी घराबाहेर पडताच सूरज भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

नुकताच 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाण याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज पॅडी 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताना भावुक होतो. आपला खास, जवळचा मित्र आता सोबत नसणार या विचारानेच तो गहिवरून गेला आहे. 

सूरजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, "माझा देव, पॅडी दादा! माझी काळजी करणारा,माझा सांभाळ करणारा, मला समजून सांगणारा. मला कधी घरच्यांची उणिव न भासू देणारा. आज आमच्या पासून 'बिग बॉस'मधून बाहेर गेले. पण, तुम्ही माझ्या काळजात आयुष्यभर राहणार. तुमची ईच्छा मी पूर्ण करणार आणि ट्रॉफी घेऊनच येणार. miss you & love you". सूरजने शेअर केलेल्या या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला 'माझा भाऊ गेला, माझा कणा मोडला...' असं गाणं दिलंय. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावुक झाले आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया