Join us  

अंकिताने पाय धरून वर्षा ताईंना फरफटत नेलं, 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात काय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:00 AM

आज खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळात अंकिता आणि वर्षा ताईंमध्ये चांगलीच लढत होणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतीच 'बिग बॉस'ने यंदाचं पर्व ७० दिवसांमध्ये संपणार असल्याची घोषणा घरात केली आहे. ग्रँड फिनालेसाठी आता फक्त २ आठवडे बाकी आहेत. त्यामुळे साहजिकच आता घरात राहिलेले आठ सदस्य या शोमध्ये आपलं स्थान आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. आताही 'बिग बॉस मराठी'च्या घरात नवा खेळ पाहायला मिळणार आहे. आज घरात लगोरीचा खेळ खेळला जाणार आहे. लगोरीचा खेळ काहीशा हटके पद्धतीने खेळण्यात येणार आहे. या टास्कसाठी ८ सदस्य दोन गटांमध्ये विभागले जाणार आहेत. आज खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळात अंकिता आणि वर्षा ताईंमध्ये चांगलीच लढत होणार आहे. त्यांच्यामध्ये होणारी खेचाखेची प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या रंगतदार टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल.

'बिग बॉस मराठी'च्या घरात आताच्या घडीला अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, पंढरीनाथ, वर्षा, निक्की आणि धनंजय असे एकूण आठ सदस्य आहेत. फिनाले अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे येत्या आठवड्यात हे सगळे सदस्य नॉमिनेट आहेत. त्यामुळे या आठवड्यात स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सगळ्या सदस्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. आपल्या खेळाबद्दल सदस्य एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत.  'बिग बॉस मराठी'चा महाअंतिम सोहळा येत्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. ग्रँड फिनालेमध्ये कोण मानाची ट्रॉफी  उंचावणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीवर्षा उसगांवकरसेलिब्रिटी