Join us

होणाऱ्या नवऱ्याला घेऊन अंकिता पोहोचली सूरजच्या गावी, म्हणाली- "लग्नाचं आमंत्रण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 9:47 AM

'बिग बॉस'मराठी फेम अंकिता वालावलकर थेट पोहोचली बारामतीला, सूरज चव्हाणची घेतली भेट!

Ankita Walawalkar: 'बिग बॉस'मराठी (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वाने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. हा शो जरी संपला असला तरी त्यातील स्पर्धकांची क्रेझ आजही कायम आहे. बारामतीचा पठ्ठ्या 'गुलिगत किंग' सूरज चव्हाण (Suraj Chavan) या पर्वाचा विजेता ठरला. दरम्यान, या पर्वातील स्पर्धक हा शो संपला तरी त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आपुलकीचं, मायेचं नातं जपताना दिसत आहेत. एकमेकांच्या भेटीगाठी ते घेतायत. नुकतीच जान्हवी किल्लेकर, परदेसी गर्ला इरिनासह वैभव चव्हाण यांनी सूरज चव्हाणची त्याच्या मुळगावी जाऊन भेट घेतली होती. परंतु सूरजची मानलेली बहीण अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) त्याला भेटली नव्हती. पण, अखेरीस अंकिताने तिच्या कामातून वेळ काढत सूरजची भेट घेतल्याची पाहायला मिळते.

कोकण हार्टेड गर्ल अंकिताने सोशल मीडियावर तिच्या आणि सूरजच्या भेटीचा गोड व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन अंकिता मोढवे गावात पोहोचली आहे. तिथे जाऊन अंकिता-कुणाल छान वेळ घालवत आहे. सूरजच्या कुटुंबीयांसोबत ते मिसळून गेले आहेत. शिवाय गुलिगत किंग ने त्यांना संपूर्ण गावाची सफर आणि देवदर्शनही घडवलं आहे. 

अंकिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओला कॅप्शन देत तिने लिहलंय, "सूरज चव्हाणचं गाव! 'बिग बॉस'नंतर भेटायचं म्हटलं तर त्याच्याकडे होणाऱ्या गर्दीचा विचार करुन मी आरामात भेटायचं ठरवलं खरं पण त्याला वाटू लागलं की पॅडी दादा आणि अंकिता ताई येत का नाहीत. खरंतर माझ्या त्रासासाठी नाही पण त्याला होणारा त्रास कमी होईल म्हणून उशीरा भेट घ्यायची होती. रोज असणारी फोटोसाठी प्रचंड गर्दी आणि महाराष्ट्राच प्रेम त्याच्यामागे असंच कायम राहुदे, आणि हो लग्नाचं आमंत्रण पण मी दिलं आहे". 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरबिग बॉस मराठीसोशल मीडिया