Join us  

संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 4:54 PM

स्नेहल चौगुलेने व्हिडीओमध्ये संग्रामचा गेम प्लॅन, ट्रोलिंग, स्वभाव या सगळ्यावर भाष्य केलं.  

 Sangram Chougule Latest Update : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या सीझनमध्ये घरात A आणि B असे दोन ग्रुप आहेत. पण, या दोन्ही ग्रुपपैकी एकाही ग्रुपमध्ये वाइल्ड कार्ड ( First Wild Card Entry) म्हणून एन्ट्री घेतलेला संग्राम अजून जागा बनवू शकलेला नाही. शिवाय, त्याचा गेम पाहता प्रेक्षकांनीही त्याला ट्रोल केलं आहे. हा तर वैभव पार्ट २ असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. "बिग बॉस'च्या घरातही संग्रामला टार्गेट केले जाते आहे. आता त्यावर संग्रामच्या पत्नीने व्हिडीओ शेअर करत सर्वांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

संग्रामची पत्नी स्नेहल चौगुले हिने  इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलंं, "संग्राम दिसतो बलाढ्य, पण तो खूप प्रेमळ, हसमुख emotional आहे. सगळ्यात main गोष्ट म्हणजे तो चॅप्टर नाहीये, खूप सिंपल सरळ व्यक्ती आहे. त्यामुळे त्याला तिथं survive करणे अवघड होतंय. कारण बाकीचे खूप diplomatic आहेत. या सगळ्यांसारखं अमानुषपणे नाही . तो माणूस म्हणून खूप चांगला आहे..त्याला हे असे छक्के पंजे जमत नाहीयेत.. तो अजिबात diplomatic नाहीये...त्यामुळे त्याला इतरांसारखे खेळायला जमेना, संग्राम माणुसकी जपणारा राजा आहे".

स्नेहल चौगुलेने व्हिडीओमध्ये संग्रामचा गेम प्लॅन, ट्रोलिंग, स्वभाव या सगळ्यावर भाष्य केलं.  ती म्हणाली, "मान्य आहे पहिल्या फेरीत संग्रामची चूक झाली. टीम A मुळे गोंधळ झाला. पण, आता 'बिग बॉस'च्या घरात जाऊन संग्रामला १० दिवस झाले आहेत. पण,  B टीम संग्रामला त्यांच्यात मिसळून घेत नाहीये. संग्रामला नॉमिनेट कसे करायचे हे त्यांचं प्लॅनिग सुरू आहे. दुसरीकडे आपल्यासाठी संग्रामने खेळलं पाहिजे, अशीही त्यांची अपेक्षा आहे. मागे बसून त्याला मानकाप्या बोललं जातं. त्याला विचित्र नावं ठेवली जात आहेत.  जे चुकीचे आहे. साथला प्रितसाद मिळत असतो. जर साथच दिली नाही, तर प्रतिसादाची अपेक्षाही नाही केली पाहिजे".

पुढे स्नेहल म्हणाली, "बीबी करन्सीच्या टास्कमध्ये अंकिताने शुन्य कमावलं. निक्कीच्या हातून जेव्हा बंदूक ओढायची होती, तेव्हाही तीला टास्क खेळता आला नाही. पण, तिला कोणीही ब्लेम केलं नाही. पण, संग्रामकडून पहिल्या फेरीत चूक झाली, तर त्याला ब्लेम केलं जात आहे. पण खरे तर हे एक टीमवर्क असतं. तिसऱ्या फेरीत संग्रामने १०० टक्के दिलं. संग्रामने अरबाजवरून पॅडीदादांकडे बॉल फेकला. तेव्हा पॅडीदादांना तिथल्या तिथे तो बॉल उचलून अरबाजच्या घरट्यात टाकता आला नाही. यातही पॅडीदादांना कोणीच  ब्लेम केलं नाही. ब्लेम गेम फक्त संग्रामवर होतोय.  हे मला अजिबात पटलेलं नाही".

ट्रोलर्सबद्दल स्नेहल म्हणाली,  "ट्रोलर्सचं तर ते कामचं आहे. त्यांचं पोट हे ट्रोल करुनच भरतं. पण त्यांना हीच विनंती आहे की आधी स्व:ताला आरशात पाहा, तुम्ही किती मिळवलं आहे आयुष्यात. संग्रामने देशासाठी ४०० पेक्षा जास्त मेडल मिळवलेले आहेत.  संग्रामचं वय हे ४७ आहे. आरबाजचं वय हे त्याच्या आर्धदेखील नसेल. तरीही ते त्याला टफ फाईट देत आहेत".

 'बिग बॉस'च्या घरात टीम B कडून संग्रामला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर स्नेहल हिने संताप व्यक्त केला. ती म्हणाली, "संग्रामची स्ट्रॅटजी ऐकून घेतली जात नाही. त्याची मते ऐकून घेतली जात नाहीत.  त्यांना कॉर्नर केलं जात आहे. हे मला आजिबात मान्य नाही. शिवाय जान्हवी आणि संग्रामबद्दलही चुकीचं बोललं जात आहे. त्यांच्या मैत्रीला अंकिता, पॅडी, अभिजीत आणि डीपी यांच्याकडून वेगळाच अ‍ॅगल दिला जातोय. जर संग्राम कसा आहे, हे तुम्हाला माहिती नसेल तर कृपया बोलू नये".

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीरितेश देशमुख