बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा सीझन सुरू होऊन पाच आठवडे उलटले आहेत. दिवसेंदिवस घरातला खेळ रंगत चालला आहे. पहिल्या आठवड्यात घराची कॅप्टन अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) होती. त्यानंतर अरबाज पटेल (Arbaz Patel) कॅप्टन झाला. त्याला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर दोन दिवसात गेम पलटला आणि कॅप्टन्सी निक्की तांबोळी(Nikki Tamboli)ला मिळाली. खरेतर अरबाजने तिला गिफ्ट दिले. त्यानंतर आता घराला चौथा कॅप्टन मिळाला आहे. या आठवड्यात वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) घराच्या नवीन कॅप्टन आहेत. त्यामुळे आता नॉमिनेशन टास्कमध्ये त्या सुरक्षित आहेत.
या आठवड्यातील कॅप्टन्सीसाठीचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये शेवटी अंकिता, जान्हवी, वर्षा, वैभव आणि सूरज हे पाच सदस्य राहिले होते. यांच्यामधून एक जण कॅप्टन होणार होता. या सदस्यांनाच आपापसात सहमती दर्शवून एक कॅप्टन निवडायचा होता. पण त्यांच्यात बहुमत न झाल्यामुळे बिग बॉस ट्विस्ट आणला.
पाताळ लोक टास्क हरलेल्या ए टीमला दिला. अरबाज, निक्की, अभिजीत, पॅडी आणि घन:श्याम या पाच सदस्यांना कॅप्टनची निवड करायची होती. या पाच जणांनी वर्षा उसगांवकर यांचे नाव सुचवले. वर्षा उसगांवकर यांनी कॅप्टन पद स्वीकारल्यानंतर घरात घोषणा ऐकायला मिळाल्या. हमारा नेता कैसा हो, वर्षाताई जैसा हो असा आवाज घरात घुमला. वर्षा उसगांवकर बाहेर आल्यानंतर सर्व सदस्यांचे त्यांनी आभार मानले. वर्षा उसगांवकर कॅप्टन झाल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात काय बदल घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.