बिग बॉस मराठीचा नवा सीझन सध्या गाजत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर हिची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या अंकिताचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अंकिताने 'भांडी घासण्याचा ट्रॉमा' असल्याचं सांगितलं. यानंतर अंकिताला ट्रोल केलं जात आहे. तसेच यावरून मीम्स देखील तयार करण्यात आले आहेत.
'कोकण हार्टेड गर्ल'ला ट्रोल केल्यानंतर तिच्या बहिणी धावून आल्या आहेत. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. "सोशल मीडियावरच्या दोन मिनिटांच्या क्लिपवरून आपण एखाद्या व्यक्तीचं अख्ख आयुष्य क्षणात judge करतो. पण कधी कधी आपल्याला क्षुल्लक वाटणारी गोष्ट एखाद्याला आयुष्यभराची जखम देणारी असू शकते हे आपण सपशेल विसरतो. बाकी प्रेक्षकाक काळजी...." असं म्हटलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हि़डीओ शेअर केला आहे.
"जर मी तुमच्या जागी असती तर अरे भांडी घासायचा ट्रॉमा कोणाला असतो असं मलाही वाटू शकतं.... पण आपल्यासाठी जी गोष्ट क्षुल्लक असते, आपण जी गोष्ट अगदी सहज करू शकतो. ती गोष्ट एखाद्यासाठी किती क्षुल्लक असू शकते याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. ट्रॉमा म्हणजे काय तर शरीराला, मनाला झालेली जखम... जी भरून निघणं किती कठीण असतं ते त्या व्यक्तीलाच माहीत असतं. ताईच्या त्या स्टेटमेंटवरून लोक मीम्स बनवत आहेत. कमेंट पास करत आहेत."
"खरंच आपल्यातली माणुसकी इतकी लयाला गेलीय का? एखाद्याचा ट्रॉमा आपल्यासाठी मीम मटेरियल बनतोय? आपली ताई स्ट्राँग आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. भांडी घासणं हा तिचा विक पॉईंट नाही. तिची अंगमेहनत, कष्ट तिने वेळोवेळी दाखवले आहेत. त्यामागची कारणं, भीती, गांभीर्य यामागचा आपण विचार करायला पाहिजे" असं अंकिता प्रभू वालावलकर हिच्या बहिणींनी म्हटलं आहे.
बिग बॉसच्या घरात अंकिता आर्यासोबत गप्पा मारत असते. तेव्हा ती म्हणते की, "मला भांडी घासायचा ट्रॉमा आहे. तरिही मी ते करत आहे. माझ्या घरच्यांना पण माहिती आहे." त्यावर आर्याने तिला मी भांडी घासते असं सांगितलं. तर अंकिताने तिला नको म्हणत मला भांडी घासायचीच आहेत. कारण मला माझ्यातील विक पॉईंटवर काम करायचं आहे असं म्हटलं होतं.