'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला अवघा एक आठवडा बाकी आहे. हा शो खूपच रंजक वळणावर पोहोचला आहे. या आठवड्यात घरातील सर्वच ८ सदस्य नॉमिनेटेड होते. त्यापैकी आता ७ सदस्य सुरक्षित झाले आणि पंढरीनाथ कांबळेचा प्रवास 'बिग बॉस;च्या घरातून आता संपला आहे. पंढरीनाथ कांबळे यांनी ६२ दिवसांनंतर 'बिग बॉस'च्या घराचा निरोप घेतला. अशातच आता घराबाहेर आल्यावर पंढरीनाथ कांबळे यांनी त्यांची पहिली पोस्ट शेअर केली आहे.
अगदी ग्रँड फिनालेच्या आधी घराबाहेर पडल्याने पंढरीनाथ नाराज झाले. घराबाहेर येताना त्यांनी पूर्ण पाठिंबा सूरजला दिला. स्वत:च्या म्युच्युअल फंड्समधील ५० कॉइन्सचा वारसदार देखील त्यांनी सूरजला केलं आहे. घराबाहेर आल्यावर पंढरीनाथ कांबळे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पंढरीनाथ कांबळे हे ग्राफिक्समध्ये एखाद्या वॉरियरप्रमाणे लढा देत असल्याचं दिसून येतंय. तर व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी "आपण रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमासाठी आपले मनापासून आभार!", असे लिहलं आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय.
"बिग बॉस मराठी'च्या घरात आता पंढरीनाथच्या एलिमिनेशननंतर घरात फक्त ७ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण होणार हे पाहणं आता शेवटच्या आठवड्यात महत्त्वाचं ठरणार आहे.