Join us

"कधी-कधी मी चुकीचं वागते, पण मी कपटी नाही", काय म्हणाली निक्की तांबोळी? पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 10:04 AM

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'च्या घरावर राज्य करणारी अभिनेत्री निक्की तांबोळी थेट फिनालेमध्ये पोहचली आहे. अगदी पहिल्या दिवसापासून निक्कीचा खेळ आणि तिची संपुर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे. या संपुर्ण प्रवासात निक्कीने अनेकांशी वाद घातले, कचाकच भांडली. तर काही क्षणाला ती रडतानाही दिसून आली. आता 'बिग बॉस'चा हा प्रवास शेवटाकडे आल्यानंतर निक्कीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती स्वतःविषयी आणि घरातील स्पर्धकांविषयी बोलताना दिसून येत आहे. 

कलर्स मराठीने एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय  प्रोमोमध्ये निक्कीने घरात चुकीचे वागल्याचे मान्य केले आहे. पण, आपण कपटी नसल्याचे तिने म्हटले. व्हिडीओमध्ये निक्की म्हणते,"कपटीपणा, नालायकपणा, कुचकट हे सर्व माझ्यात नाही.  मी अशी नाही. मी माझ्या मनापासून स्वच्छ आहे. हे मानते की या घरात मी चुकीचे वागले आहे. लोकांचे मन दुखावले. पण, मलाही तेवढाच त्रास झालेला आहे".

'बिग बॉस'च्या घरात आता शेवटचे ७ सदस्य उरले आहेत. त्यामध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पवार आणि सुरज चव्हाण यांचा समावेश आहे. येत्या ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा होणार आहे. आता या  सदस्यांपैकी एक जण विजयी होणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेकडे आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीमराठी