Join us

"तिकडे चावडीच्या भीतीने बोबडी वळायची..." अपूर्वाचा रोख नेमका कुणाकडे? लगावला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:52 PM

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन प्रेक्षकांसाठी जणू मनोरंजनाची पर्वणीच घेऊन आला आहे.

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन प्रेक्षकांसाठी जणू मनोरंजनाची पर्वणीच घेऊन आला आहे. यंदाच्या सीझनला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नेटकऱ्यांपासून कलाविश्वातील अनेक कलाकार या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या खेळीवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या या पाचव्या  सीझनमध्ये घरातील सदस्यांमध्ये वाद-विवाद, राडे तसेच गॉसिपिंग पाहायला मिळते आहे. दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या आधीच्या सीझनमधील स्पर्धकही यंदाच्या सीझनमधील स्पर्धकांच्या खेळीबाबत सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. 

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. तिच्या या स्टोरीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आपल्या दमदार खेळीने अपूर्वाने 'बिग बॉस मराठी'चं चौथ पर्व चांगलच गाजवलं. अशातच अभिनेत्रीची ही स्टोरी पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्याचं पाहायला मिळतंय.

अपूर्वाने या स्टोरीमध्ये लिहलंय, "स्वत: च्या सीझनमध्ये बघे असलेले हे काही सदस्य आता सोशल मीडियावर खेळायला उतरलेत. तिकडे चावडीच्या भीतीने बोबडी वळायची आणि आता स्टोरीवर स्टोरी टाकत आहेत".

पुढे अभिनेत्री म्हणते, "Bigg Boss मध्ये असताना जे फेम मिळवता आले नाही ते मिळवण्याचा आता फालतु प्रयत्न! हे म्हणजे नापास झालेल्या लोकांनी युपीएससी वाल्यांना टिप्स देण्यासारखं आहे. परंतु तो 'Bigg Boss' आहे. त्याला कितीही नावे ठेवा, तरी तो तुम्हाला नुसत फेमसच नव्हे तर मोठं करतोच".अपूर्वाने या भल्यामोठ्या स्टोरीच्या माध्यमातून नक्की कोणाला टोला लगावला आहे? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्ये अपूर्वाने काम केलं आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत तिने साकारलेल्या शेवंता नावाच्या पात्राने चाहत्यांच्या मनावर जादू केली. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहरील 'प्रेमाची गोष्ट' मध्ये एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीअपूर्वा नेमळेकरटिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरल