Join us  

"पॅडी दादांसारखी माणसं बिग बॉसला हवी असतात..." शिव ठाकरेने स्पष्टचं सांगितलं, म्हणाला..,

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 5:41 PM

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सर्वाधिक चर्चेत राहणारा शो ठरतोय.

Shiv Thakre: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सर्वाधिक चर्चेत राहणारा शो ठरतोय. यंदाच्या सीझनमध्ये रिलस्टार ते कीर्तनकार सहभागी झाले होते. या शोप्रमाणे 'बिग बॉस'मधील स्पर्धकांचीही सगळीकडे चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अशातच फिनालेला काहीच दिवस बाकी असताना एका स्पर्धकाचा प्रवास संपला. हा स्पर्धक म्हणजे पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे. पॅडीचा 'बिग बॉस मराठी'मधील प्रवास संपला आहे. ६३ दिवस खेळून पॅडी कांबळे 'बिग बॉस'मधून बाहेर गेले. पॅडी कांबळे घराबाहेर पडल्यामुळे त्यावर शिव ठाकरेनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

नुकतीच शिव ठाकरेने 'लोकमत फिल्मी'सोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान, तो म्हणाला,"यंदाच्या सीझनमध्ये सगळे स्पर्धक चांगले आहेत. पण, मला पॅडी दादाचा खेळ खूप आवडला. तो शब्दांमध्ये जे काही खेळत होता ते मला आवडलं. दरम्यान 'बिग बॉस'मध्ये अभिजीत बिचुकले आले होते. त्यांना पॅडी दादांनी खूप चांगल्या पद्धतीने हॅंडल केलं. मी पॅडी दादाला आता मेसेज करणार आहे. शिवाय त्यांचा सूरजसोबतच जो काही बॉंड आहे ते सगळं मला फार आवडलं. आपल्या मराठी लोकांना अशा स्पर्धकाला पाहून खूप मजा येईल. कारण, तो हुशार आहे. कलाकार म्हणून तो जेवढा मोठा होता 'बिग बॉस'मध्ये तो तेवढ्याच जिद्दीने सगळ्यांना सांभाळून खेळला". 

"मराठी कलाकार नेहमीच माणुसकी जपून सगळं करतात. तो एक स्पर्धक नव्हता तर तो माणूस म्हणून चांगला होता. तो तिथे ज्या गोष्टीसाठी गेला होता त्यासाठी पॅडी दादांनी आपले शंभर टक्के दिले. मला असं वाटतं त्याचा प्रवास फार छान होता".

शिव ठाकरे हा 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. अमरावतीच्या या वाघाने प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं होतं. त्याचा प्रेमळ स्वभाव, तसंच कमालीचा फिटनेस पाहून तो सर्वच बाबतीत अग्रेसर ठरला होता. 

टॅग्स :शीव ठाकरेबिग बॉस मराठीभातसेलिब्रिटी