Join us  

"Well Played भावा, कसलं पळवलंस दोघांना...", पंढरीनाथचा खेळ पाहून सिद्धार्थ जाधवची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:06 AM

'बिग बॉस मराठी'च्या घरात पार पडलेला कॅप्टनसी टास्क सध्या चर्चेचा विषय बनतोय.

'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. कधी घरातील सदस्यांची भांडणे, वाद-विवाद, तर कधी बिग बॉसने दिलेला टास्क या सर्व गोष्टींमुळे यंदाचा सीझन गाजतोय. घरात नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. 'बिग बॉस मराठी'च्या घरात पार पडलेला कॅप्टनसी टास्क सध्या चर्चेचा विषय बनतोय. या टास्कमध्ये पंढरीनाथ कांबळे ( Pandharinath Kamble ) अर्थात पॅडी हे जबरदस्त खेळले. त्यांच्या या खेळाचं अभिनेता सिद्धार्थ जाधवने कौतुक केलं आहे.

 कॅप्टन्सी टास्कमध्ये पंढरीनाथ हे जबरदस्त खेळताना पाहायला मिळाले. विरुद्ध टीममध्ये असलेल्या अरबाज-वैभवला त्यांनी चांगलंच पळवलं. त्यांचा हा खेळ पाहून सिद्धार्थ जाधवने देखील पंढरीनाथसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यासोबत सिद्धार्थने पॅडीचा अपमान करणाऱ्या सदस्यांचे देखील अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत. त्याने लिहलं, "Well Played भावा… काही लोकांना ओव्हर अ‍ॅक्टिंग वाटत होती… आज त्यांना तुझा ओव्हर अ‍ॅक्टिव्हपणा नक्कीच दिसला असेल… कसलं पळवलंस दोघांना… यालाच म्हणतात अनुभव! कडक चपळ".  

बिग बॉस'च्या घरात पाहिल्या काही आठवड्यात पंढरीनाथ कांबळेच्या करिअरबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचा अपमान करण्यात आला होता. जान्हवीने पंढरीनाथ यांना "आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करत आहे" असं म्हणत त्याच्या अभिनयाची खिल्ली उडवली होती. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवबिग बॉस मराठी