बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 5)च्या सोमवारचा एपिसोड घरातील सदस्यांसाठी खूपच रोमांचक ठरला. बिग बॉसने आज घरातील पाणी बंद केले, ज्यामुळे घरातील सदस्यांना खूपच अडचण आली. पाणी बंद होण्यामुळे सर्व सदस्य तणावात आले. त्यानंतर बिग बॉसने एक टास्क दिला, ज्यात सदस्यांना निर्णय घेऊ न शकणाऱ्या सदस्यांची नावे घ्यायला सांगितले. घरातील सर्व सदस्यांनी धनंजय, इरिना आणि सूरज यांची नावे घेतली. इरिना आणि सूरजची नावे घरातील सदस्यांनी एकत्रित घेतली, परंतु सोशल मीडिया स्टार धनंजय(Dhananjay Powar)ने स्वतःच आपले नाव पुढे केले. यावर निक्की तांबोळी(Nikki Tamboli)ने धनंजयला समजावण्याचा प्रयत्न केला.
निक्कीने धनंजयला त्याच्या निर्णयांसाठी लढले पाहिजे आणि स्वतःहून आपले नाव का पुढे करायचे? यावर समजवले. निक्कीने स्पष्टपणे सांगितले की, तो स्वतःसाठी लढू शकतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. निक्की तांबोळी स्वतःसाठी नेहमीच उभी राहते, परंतु तिने इतरांनाही त्यांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली. तिचा हा अंदाज खूपच रोचक होता. तिच्या या कृतीमुळे घरातील सदस्यांच्या मनात तिच्याबद्दल आदर वाढला.
निक्कीच्या या उपक्रमामुळे तिने आपली स्वतःची प्रतिमा मजबूत केली आहे आणि इतरांना ही आपल्या हक्कासाठी उभे राहण्याची प्रेरणा दिली आहे. तिच्या या प्रेरणादायी वागण्यामुळे तिने आपल्या सहकाऱ्यांना आपले मत स्पष्टपणे मांडण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची शिकवण दिली आहे. बिग बॉसच्या या टास्कमुळे घरातील वातावरण आणखी रंगतदार झाले आणि सदस्यांच्या मनात विचारांची वादळे उठली. निक्कीच्या या वागण्यामुळे तिने घरातील सदस्यांसाठी एक नवीन दृष्टिकोन आणला आहे.