Join us  

'बिग बॉस मराठी'घरात धमाल, सूरजने केली अरबाजची नक्कल; व्हिडीओ पाहून होईल हसू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 9:47 AM

आता 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा सुरू झाला आहे. आता हा आठवडा कसा रंगणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता एक नवा प्रोमो समोर आला आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले.  भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशमुखने सगळ्या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली होती. आता 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा सुरू झाला आहे. आता हा आठवडा कसा रंगणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता एक नवा प्रोमो समोर आला आहे. 

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो फारच मजेशीर आहे. या प्रोमोमध्ये सुरज चव्हाण, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे अरबाज, निक्की आणि वैभवची नक्कल करताना पाहायला मिळत आहेत. प्रोमोमध्ये धनंजय वैभवची आणि जान्हवी किल्लेलकर निक्कीची आणि सूरज हा अरबाजच्या भूमिकेत दिसत आहे. या तिघांना हुबेहुब नक्कल करताना पाहून निक्की आणि अरबाजदेखील हसताना पाहायला मिळत आहेत. 

'बिग बॉस मराठी'च्या घरातील हा सहावा आठवडा सदस्यांची झोप उडणार असल्याचे संकेत भाऊचा धक्क्यावर शोचा होस्ट रितेश देशमुख याने दिलेत. त्यामुळे हा आठवडा घरातील सदस्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. सहाव्या आठवड्यात घराच्या कॅप्टन  वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) घराच्या नवीन कॅप्टन आहेत. त्यामुळे आता नॉमिनेशन टास्कमध्ये त्या सुरक्षित आहेत. वर्षा उसगांवकर कॅप्टन झाल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात काय बदल घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखकलर्स मराठीसेलिब्रिटी