Join us  

"तू कालही विजेता होतास, आजही आहेस..." उत्कर्ष शिंदेचा सूरजला फूल सपोर्ट, शेअर केली खास पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 9:39 AM

'गुलीगत फेम 'सूरज चव्हाणसाठी उत्कर्ष शिंदेने पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली आहे. 

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा शेवटचा आठवडा सुरू आहे. हा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवघ्या एका दिवसावर 'बिग बॉस मराठी' सीझन ५चा ग्रँड फिनाले आला आहे. दरम्यान, घरातील सदस्यांचे वाद, मज्जा-मस्ती किंवा अन्य कारणांमुळे या शोची सगळीकडे चर्चा रंगली. अशातच या पर्वातील स्पर्धकांची वागणुक किंवा त्यांची टास्कदरम्यानची खेळी स्पर्धकांना आवडली नाही तर ते वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलाकार मंडळीही यात कुठे कमी नाही. अशातच प्रेक्षकांमध्ये खरी चर्चा सूरज चव्हाणची आहे. शिवाय रिलस्टार गुलीगत धोका फेम सूरज चव्हाणचा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सूरजला सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यत सगळेच पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान, 'बिग बॉस मराठी'चा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर सूरजला सपोर्ट करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

'गुलिगत किंग'ला लोकप्रिय गायकाचा फुल सपोर्ट - 

सोशल मीडियावर लोकप्रिय मराठी गायक आणि बिग बॉस मराठीच्या सीझनचा माजी स्पर्धक असलेल्या उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणला सपोर्ट करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहलंय, "My all prayers with You". असं म्हणत उत्कर्षने  पुढे म्हटलंय, "कपाळावरील रेषेमुळे नाहीतर, कपाळावरील घामामुळे तू कालही विजेता होतास, आजही आहेस आणि उद्याही तू विजेता राहशील". 

'बुक्कीत टेंगूळ’ म्हणत या सूरज चव्हाणने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. अगदी अल्पावधीतच त्याने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. सूरजचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. दरम्यान उद्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक ‘बिग बॉस’ची ट्रॉफी उंचावणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया