Join us  

Bigg Boss Marathi Season 5: आर्याने निक्कीला कानाखाली मारलं, पण असं कुठे दिसलं? मराठी अभिनेत्रीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 10:49 AM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: बिग बॉस आर्याला काय शिक्षा देणार?

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस सीझन पाच सध्या रंजक वळणावर आहे. काल झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्कीची झटापट होते. यात आर्या निक्कीला कानाखाली मारते. यामुळे बिग बॉस कॅप्टन्सी टास्क रद्द करतात आणि आर्याला जेलची शिक्षा देतात. दरम्यान अभिनेत्री सुरेखा कुडचीने (Surekha Kudchi) सोशल मीडियावर पोस्ट करत प्रश्न विचारला आहे.

सुरेखा कुडची नेहमी बिग बॉसचे एपिसोड पाहून आपलं मत लिहीत असता. कालच्या एपिसोडनंतर त्यांनी लिहिले, "काल आर्याने निक्कीच्या कानाखाली वाजवली असं म्हणत आहेत. खरं तर एपीसोड मध्ये असं क्लिअर दिसलं नाहीए. तो अरबाज बोंबलत सुटला डायरेक्ट थप्पड मारला म्हणून....आणि मग काय निक्कीने तेच उचलून धरलं...वास्तविक पाहता तसं कुठेही दिसलं नाहीये...बाकी काल जान्हवीचा गेम आवडला...पॅडीही भारी खेळला."

आज भाऊच्या धक्क्यावर रितेश आर्याला काय शिक्षा द्यायची हे बिग बॉसच्याच हातात सोपवणार आहेत. त्यामुळे बिग बॉस आर्याला थेट एलिमिनेट करायची शिक्षा देतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच घरात निक्की, अरबाज विरोधात वातावरण टाईट आहे. बी टीम आर्याची साथ देत आहे पण आर्या कानाखाली मारुन चूक करुन बसली आहे. आज भाऊच्या धक्क्यावर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. दरम्यान या आठवड्यात निक्की, अरबाज, अंकिता, धनंजय, आर्या, वैभव हे सहा जण नॉमिनेट आहेत. यांच्यातील कोण बाहेर जाणार याकडेही लक्ष आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीमराठी अभिनेतासोशल मीडिया