Join us

ग्रेट भेट! वैभव चव्हाण, परदेसी गर्ल इरिनाची कोल्हापूर वारी; धनंजय पोवार दिसताच मिठी मारली अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:25 IST

'बिग बॉस'मधून धनंजय पोवार बाहेर येताच वैभव चव्हाण आणि 'परदेसी गर्ल' इरिनाने कोल्हापूरला जाऊन त्याची भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय.

Dhanajay Powar : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली. अगदी काही दिवसांपूर्वीच या पर्वाचा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला त्यातील स्पर्धक नेहमीच चर्चेत येत असतात. अशातच सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमधील स्पर्धक धनंजय पोवार, वैभव चव्हाण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये 'परदेसी गर्ल' इरिना देखील दिसते आहे. 

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'चा शो संपल्यानंतर वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवा या दोघांनी कोल्हापुरला जाऊन धनंजय पोवारची भेट घेतली. कोल्हापुरात गेल्यानंतर धनंजसह वैभव, इरिनाने करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता. 

नुकताच धनंजय पोवारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये वैभव, इरिना त्याला भेटण्यासाठी कोल्हापूर गाठलं आहे. धनंजयला समोर पाहताच त्या दोघांनी त्याला कडकडून मिठी मारली. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. "Bigboss मधील मैत्री आजपण टिकून आहे..." असं कॅप्शन धनंजयने या व्हिडीओला दिलं आहे. 

दरम्यान, गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनचा विजेता ठरला. त्यानंतर तेव्हादेखील वैभव-इरिनाने त्याची भेट घेतली होती. सूरजच्या 'झापूक झुपूक' स्टाईलमध्ये त्यांनी डान्स करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकोल्हापूरटिव्ही कलाकारसोशल मीडिया