Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये रोज अनेक घडामोडी घडत आहेत. घरातील सदस्यांचं आपापसात असलेलं नातं दिवसागणिक बदलताना पाहायला मिळत आहे. नव्या सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच घरात दोन ग्रुप झाले होते. मात्र भाऊच्या धक्कावर रितेश देशमुखने चक्रव्यूहमध्ये दाखवलेल्या क्लीपनंतर घरातील समीकरणंच बदलली. टीम A ची पोलखोल झाल्यावर निक्की तांबोळीने टीममधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
गेल्या चार-पास दिवसांत निक्की आणि अरबाजमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. घरातील इतर सदस्यही त्यात सहभागी झालेले दिसले. अशातच आता निक्कीने टीम B चा भात खाल्ल्यावर घरामध्ये भातावरून चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. वैभवने तुम्ही भात कुठला घेतला?, कशाला खाल्ला? असा प्रश्न अभिजीत आणि निक्कीला विचारला. त्यावर निक्की म्हणते, "मला माहीत नव्हतं ते तुमचं आहे."
"मी तुम्हाला हवं तर बनवून देते. चालेल मला... मला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही बनवून देतो ना. आता मला माहीत नव्हतं की भात तुमचा आहे म्हणून. मी तुला आमच्यातलं बनवून देते. हवाय का आता? तुला जेव्हा हवा असेल तेव्हा सांग, मी तुला देईन बनवून आमच्यातला... जेवण बनवायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. भात बनवायला आमच्या जीवावर येत नाही. पण सांगायला तुमच्या जीवावर येत आहे."
"सगळेच मला तुझ्यापासून लांब करतात..."; वाद मिटवण्यासाठी निक्कीने अरबाजला दिलं सॉल्यूशन
निक्की आणि अरबाजमध्ये प्रचंड खटके उडाले. दोघांच्या भांडणामध्ये अरबाजने भांडी फोडली, खूर्ची तोडली. रागाच्या भरात त्याने बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं नुकसान केलं. मात्र नंतर वाद मिटवण्यासाठी निक्की आणि अरबाजमध्ये चर्चा झाली. "प्रोब्लेम भरपूर होतील, मी तुला एक सॉल्यूशन देऊ का?, गुड टर्मवर एन्ड करुया. या घरात आपल्याला राहायचं आहे खूप दिवस. त्यामुळे सोबत नको खेळूया पण हसता-खेळता चेहरा, स्माईल करून राहूया" असं निक्कीने म्हटलं आहे.