Bigg Boss Marathi 5 : गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो शो अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला दिमाखदार सुरुवात झाली आहे. यंदा शोचा होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक ट्विट 'बिग बॉस मराठी'मध्ये आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात स्पर्धकांनी एन्ट्री घेताच त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस'च्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे.
यंदाच्या पर्वात ९०चं दशक गाजवलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर सहभागी झाल्या आहेत. वर्षा यांना 'बिग बॉस मराठी'च्या घरात पाहताच चाहतेही आनंदी झाले. मात्र पहिल्याच दिवशी त्यांच्यावर घरातील सदस्य चिडल्याचं दिसत आहे. पहिल्याच दिवशी घरात पाणी नसल्याने 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांच्या तोडंचं पाणी पळालं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळीमध्ये वादाची ठिणगी उडाल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओत वर्षा उसगावक बेडरुममध्ये मेकअप करत असल्याचं दिसत आहे. तर हॉलमध्ये सगळे सदस्य त्यांची वाट पाहत आहेत.
निक्की त्यांना बोलवायला जाते आणि म्हणते की मेकअप नंतर करा ना प्लीज. त्यावर वर्षा उसगावकर तिला "मला थोडंसं तयार व्हायलाच पाहिजे. तू व्यवस्थित तयार झालीस", असं म्हणतात. त्यानंतर निक्की म्हणते की पाणी कधीच आलं होतं. तुम्ही जायचं होतं. आता लिपस्टिक नंतर लावा, चला आधी. निक्कीच्या या बोलण्यावर वर्षा तिला म्हणतात, "लिपस्टिक नंतर लावा कसं? तू छान तयार होऊन गेली आहेस". त्यानंतर घरातील इतर सदस्यही त्यांना हॉलमधून बोलवत असतात. पण, वर्षा उसगावकर मात्र मेकअप केल्याशिवाय बेडरुममधून बाहेर पडत नाहीत.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे.