Join us  

"स्वतःचं माणुसपण जपत...", विशाखा सुभेदारनं पॅडीला मत देण्याचं केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 6:40 PM

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन शेवटच्या टप्प्यात आला आहे. ६ ऑक्टोबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या सीझनमध्ये पॅडी कांबळे त्याच्या अफलातून खेळाने सर्वांची मनं जिंकतोय.

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) शेवटच्या टप्प्यात आला आहे. ६ ऑक्टोबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या सीझनमध्ये पॅडी कांबळे (Pandharinath Kamble) त्याच्या अफलातून खेळाने सर्वांची मनं जिंकतोय. दरम्यान आता अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) हिने सोशल मीडियावर पंढरीनाथ कांबळेचा फोटो शेअर करत त्याला मत देण्याचे आवाहन केले आहे.

विशाखा सुभेदार हिने इंस्टाग्रामवर पंढरीनाथ कांबळेचा मतदानाचे डिटेल्स असणारे पोस्टर शेअर करत त्याला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, मनात अनेक प्रश्न असतील त्याच्या, ह्या सगळ्यांच्याच खरंतर.. घरात सगळं कसं सुरु आहे. पोर शाळेत जातयं का.. घरखर्च सगळा नीट जमतोय का..? ह्याची काळजी असेलच हे सगळं सांभाळून डोक्यात ठेवून बिग बॉसच्या घराची तारेवरची कसरत करत पॅडी स्वतःचं माणुसपण जपत प्रामाणिकपणे खेळत आहे.. ते सुद्धा उद्धट न बोलता हाणामारी न करता, सांभाळून खेळतोय , हा पण त्याची जर खोडी काढली, काम जर नाही केली तर तोंडाचा पट्टा देखील चालवतोय.खेचा खेची करत माहौल कधी गरम तरी नरम कधी खुमासदार, तर कधी शांत कधी प्रेमळ, कधी समजुतदार...जसा तो बाहेर च्या जगात तसाच आतल्या बंद जिवंत घरात.

तिने पुढे म्हटले की, आपला पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे आत्ता टॉप ५च्या दिशेने प्रवास करतोय, त्या ठिकाणी तुम्हीच त्याला पोचवू शकता. मंडळी त्याचा प्रवास असाच पुढे रहावा म्हणून त्याला भरभरून मत दया. आपला पॅडी. 

टॅग्स :भातबिग बॉस मराठी