Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या कालच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेशने टीम B ला चांगलाच धक्का दिला. तर दुसरीकडे निक्कीच्या खेळाचं कौतुक केलं. सगळेच निक्कीच्या अवतीभोवती फिरत आहेत सगळ्यांचाच खेळ निक्कीवरच का अवलंबून आहे असं म्हणत रितेशने संपूर्ण घराला धारेवर धरलं. यानंतर आता रितेशवर टीका होत आहे. निक्कीचं एवढं कौतुक का असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. दरम्यान विशाखा सुभेदारची (Vishakha Subhedar) पोस्ट चर्चेत आहे.
विशाखा सुभेदारने बिग बॉसच्या अनसीन अनदेखा मधला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये निक्की आणि अभिजीत गप्पा मारत आहेत. निक्की अभिजीतशी वाईल्ड कार्डबाबत संवाद साधत आहे. कालचा भाऊचा धक्काचा संदर्भ घेऊन विशाखा सुभेदारने संतप्त पोस्ट लिहिली आहे.ती म्हणते, "काल निक्की सोडून सगळेच चुकले... जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसले.. अरबाजने प्यादं केलं उरलेल्या लोकांचं. मान्य चुकलंच! त्याच्यावर (अरबाज + निक्की) तुमचा game नकोच असायला.. अरबाज आणि निक्की त्यांची त्यांची खेळी खेळत आहेत तुम्ही तुमचं खेळा..!
आत्ता धक्का... B team लाच.. आणि आम्हा प्रेक्षकांना सुद्धा
निक्कीने डबा फोडला.. तिच्या ट्रॉमामुळे ती अंधारात गेली नाही, हा तिचा गेम होता.. मग अभिजीतला त्याक्षणी टीम बीने सपोर्ट न करणं हा त्यांचा गेम असू शकत नाही? जेणेकरून निक्कीला आत जावच लागेल... Individual game आणि team स्पिरिट चा game आहे.. घेतला एकत्र डिसिजन... मग त्यांना मैत्रीचे का ढाचे आणि नियम असूनही ती सपोर्ट करीत नाही तिला काहीच बोललं गेलं नाही??? का आणि ऑपशन का दिला गेला?? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचं? फक्त B team ला का धारेवर धरलं जात??
आत्ता जरा निक्की बद्दल..ह्या बाई...निक्की ची चिक्की म्हणजे वाइल्ड कार्ड एन्ट्री.आणि हा ( मी जो post करतेय तो )video पाहिला मी आणि असं वाटलं कीं ही घरून ठरवूनच आलीय, एक handasome bb न घरात तिच्यासाठी आणायचा (माझ्यासाठीच फक्त इति निक्की ) आणि ती प्रेमाचे रंग उधळणार आणि त्याच्या बळा चा ही फायदा घेणार.. आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार!अरे हे काय आहे??? किती स्वार्थी असावं..? अप्पलपोटी, ढालगज आणि तिचं हे ज्ञान अभिजीत निमूट ऐकून कसं घेतो.. ही निक्की ची सो called स्ट्रटरर्जी..?? ह्या आधी हे एकमेकांत गुंतण आम्ही पाहिलंय..(पण ते ठरवून नाही वाटलं नंतर नंतर ते कळलंच) पण हे अग्रेशन खरं खोटं देवास ठाऊक. आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन ह्या season मधेच ऐकला पाहिला. अरबाज वैभव भिडले नाहीत.. तशी निक्की आणि जान्हवी पण भिडले नाहीत.. ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं.. कारण ती तिच्यासमोर उतरत नाही तिला उलट बोलत नाही.आणि वैभव पण घाबरतो अरबाज ला...!
विशाखा सुभेदार कायम बिग बॉस संदर्भात पोस्ट करत असते. तिचा पॅडीला तर थेट पाठिंबा आहे. तसंच बी टीमकडून ती बोलत असते. कालच्या एपिसोडवरुनही तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनीही कमेंट करत बिग बॉस कशी निक्कीचीच बाजू घेतात म्हणत संताप व्यक्त केला आहे.