Join us

Bigg Boss Marathi : आज भाऊच्या धक्क्यावर रंगणार धमाल नाच-गाण्याचा कल्ला, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 13:55 IST

आज रविवारी रात्री भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू आहे. नुकताच सातवा आठवडा पार पडला. सातव्या आठवड्यात 'बिग बॉस' मराठीच्या घरात बरेच राडे झाले. पण आठवड्याच्या शेवटी एक घटना घडली; ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होतं आहे. कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान निक्की तांबोळी व आर्या जाधवमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. यानंतर शनिवारी भाऊच्या धक्क्यावर  'बिग बॉस'ने आर्याला शिक्षा देत बाहरेचा रस्ता दाखवला. तर आज रविवारी रात्री भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

कलर्स मराठीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. निक्की, अंकिता, धनंजय, अरबाज, वैभव, वर्षा आणि सूरज यांच्यासह इतर स्पर्धक धमाल डान्स करताना पाहायला मिळणार आहेत.  त्यामुळे प्रेक्षकांचं फुल ऑन मनोरंजन होणार आहे. अभिजीत आणि जान्हवीने 'काला चश्मा' या गाण्यावर गॉगल घालून जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

याशिवाय, आज खुद्द होस्ट रितेश देशमुख हा 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणार आहे. रितेश देशमुख घरातील सर्वांना त्यांच्या कुटुंबाचे व्हिडीओ दाखवणार आहेत.  मुलांचे आणि कुटुंबाचे व्हिडीओ पाहताना सर्वच स्पर्धक इमोशनल होतात. विशेष म्हणजे या आठवड्यात डबल एविक्शन होणार आहे. आर्यानंतर नॉमिनेट सदस्यांपैकी आणखी एक सदस्य घरातून बाहेर पडणार आहे.  वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, वैभव चव्हाण आणि अंकिता प्रभू- वालावलकर हे सदस्य नॉमिनेट आहेत.  या सहा सदस्यांपैकी या आठवड्यात कुणाचा प्रवास संपणार हे आज भाऊच्या धक्क्यावर कळेल.

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीटिव्ही कलाकाररितेश देशमुख