Join us

धनंजय करतोय वर्षा उसगांवकरांच्या सौंदर्याचं कौतुक; म्हणाला "आधी जन्माला आलो असतो तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 2:18 PM

आजच्या भागात धनंजय पोवार हा वर्षा यांच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसून येणार आहे. 

Bigg Boss Marathi Day 50  : 'बिग बॉस' मराठीचं (Bigg Boss Marathi) पाचवं पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून यंदाच्या सीझनमध्ये सदस्यांचा जोरदार कल्ला पाहायला मिळत आहे. घरातील स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेल्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. आजही घरातील सदस्य त्यांच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. एवढंच नाही तर धनंजय पोवार हा वर्षा यांच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसून येणार आहे. 

आता आजच्या भागात भाऊच्या धक्क्यावर काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात रितेश भाऊ काही जोड्यांची नावे घेणार आहे. त्यातल्या एकाने चक्रावर उभं राहायचं आहे. ते चक्र गोल फिरत असताना दुसऱ्यांचं कौतुक करायचंय. यावेळी धनंजय पोवार हा वर्षा यांचं कौतुक करताना दिसणार आहेत. 

कलर्स मराठीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.  ज्यामध्ये धनंजय पोवार म्हणत आहेत, "वर्षा ताईंना ताई म्हटल्यानंतर मला चुकल्यासारखं वाटलं. मी ३०-३५ वर्षांपूर्वी का जन्माला आलो नाही आणि या बाईंच्या प्रेमात पडलो नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही अभिनेत्रींपेक्षा सर्वात बेस्ट सौंदर्य या बाईकडे आहे.  त्यांचं सौंदर्य खरचं खूप देखणं आहे". फिरत्या चक्राचा वेग वाढल्यावर खाली बसून धनंजय पोवारने वर्षा यांचं केलेलं कौतुक पाहून रितेशसह सर्व सदस्यांना हसू अनावर झालं. 

'बिग बॉस' मराठीच्या घरात जसजसा एक-एक दिवस पुढे सरकत आहे, तसंतशी समीकरणं बदलताना दिसत आहेत. निक्कीच्या कानशिलात लगावल्याने आर्या घराबाहेर पडली आहे. तर या आठवड्यात डबल एविक्शन होणार आहे. त्यामुळे आर्यानंतर आणखी कोणता सदस्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.  वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजीत सावंत, वैभव चव्हाण आणि अंकिता प्रभू- वालावलकर हे सदस्य नॉमिनेट आहेत. 

टॅग्स :वर्षा उसगांवकरबिग बॉस मराठीसेलिब्रिटी