Join us  

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचा दुश्मन कोण? पाहा हा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 1:10 PM

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सर्वत्र या सीझनचीच चर्चा आहे. या आठवड्याचा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजला आहे.

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सर्वत्र या सीझनचीच चर्चा आहे. या आठवड्याचा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजला आहे. इरिना रूडाकोवा काल घराबाहेर पडली आहे. आता या आठवड्यात सदस्य काय धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे. कालच्या भाऊच्या धक्क्यानंतर निक्की आता एकटी पडली आहे. त्यामुळे तिचा आता एकटीचा खेळ रंगणार आहे.

प्रोमोमध्ये आर्या अरबाजला म्हणत आहे,"आता आपल्या सर्वांचा मेन दुश्मन एकच झालाय". त्यावर अरबाज निक्की असं उत्तर देतो. आर्या अरबाजला पुढे म्हणते,"विसरू नकोस". अरबाज म्हणतो,"निक्कीला खूप त्रास द्यायचाय". त्यावर आर्या म्हणते,"हो...पूर्णपणे". अरबाज पुढे म्हणतो,"तू अभिजीतला इतका त्रास दे तिला काही नाही होणार". यावर निक्की आणि आर्याला म्हणते,"किव येते मला त्या लोकांची". 

घरावर आलंय नवीन संकट'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो घाबरवणारा आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"सावधान... या घरावर आलंय एक मोठं संकट... तो आलाय.. मानकाप्या...". प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची झोप उडालेली असून ते चांगलेच घाबरलेले दिसत आहेत. तसेच घरात एका आरश्यावर लिहिलेलं आहे,"एकटं फिरू नका...नाहीतर..मानकाप्या". 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्यात निक्कीचा चांगलाच बोलबाला आहे. काल इरिना बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात कोणता सदस्य बाहेर पडणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठी