Join us  

"मला मिळालेल्या लक्ष्मीने आता घर बांधणार..." सूरजच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 11:03 AM

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा ग्रॅंड फिनाले काल मोठ्या दिमाखात पार पडला.

Suraj Chavan: मनोरंजनाचा 'बॉस' असेलला कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. यंदाच्या  'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा ग्रॅंड फिनाले काल मोठ्या जल्लोषात पार पडला. लोकप्रिय रिलस्टार सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी' पर्व-५ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. या पर्वाचा तो विजेता ठरल्याने त्याच्या चाहत्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सूरज विजयी होताच त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. दरम्यान, सूरज चव्हाण विजेता ठरल्यानंतर बक्षीसात १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी. तसेच दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि इलेक्ट्रिक बाईक मिळाली. या मिळालेल्या धनराशीचा सूरज कशा पद्धतीने वापर करणार याबाबत त्याने या लोकमत फिल्मीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'बिग बॉस'चा विजेता ठरल्यानंतर सूरजने लोकमत फिल्मीसोबत खास बातचीत केली आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय, "मी कलर्स मराठीचे मनापासून आभार मानतो. या पर्वाचा विजेता ठरल्यामुळे मला त्या गोष्टीचा प्रचंड आनंद झाला आहे. मी याआधीही म्हटलं होतं या पर्वाची ट्रॉफी मीच घेऊन जाणार, असा निर्धार मी केला होता. आपल्या झापूक झुपुक हटके पॅटर्नमध्ये मी ही पुढे सूरज म्हणाला 'बिग बॉस' मधून मिळालेल्या धनाराशीचा उपयोग मी माझं घर बांधण्यासाठी करणार आहे. 'बिग बॉस'च्या घराप्रमाणेच मला माझं घर बांधायचं आहे". 

सूरज चव्हाणला बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळाली आहे. एवढेच नाही तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडियारितेश देशमुख