Join us  

Suraj Chavan : "एका हिरोने जन्म घेतला, संधीचं सोनं केलं..."; 'गोलीगत धोका'ने मारली बाजी, रितेश म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 6:51 PM

Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : सूरज घराचा कॅप्टन झालेला नसला तरी त्याने चांगलीच बाजी मारली आहे. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसरा आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा तिसरा आठवडा गोलीगत फेम सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला आहे. रितेश देशमुख आता भाऊच्या धक्क्यावर सूरजचं भरभरून कौतुक करताना दिसणार आहे. या आठवड्यात सूरज घराचा कॅप्टन झालेला नसला तरी त्याने चांगलीच बाजी मारली आहे. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसरा आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

"या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. अख्ख घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सर्वांना टफ फाईट दिली. झुंड में भेडिये आते हैं शेर अकेला ही आता है..."

"तीन आठवड्यात पहिल्यांदाच अरबाजच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. निक्की आणि जान्हवीदेखील घाबरलेल्या दिसून आल्या होत्या. कोणालाही कमी लेखू नये. हे या आठवड्यात सिद्ध झालं आहे. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. या घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका" असं म्हणत रितेश सूरजला बिनधास्त खेळण्याचा सल्ला देणार आहे. 

"एकटा पडलोय मी, आई कशी गं सोडून गेलीस तू मला..."

गुलीगत धोका फेम सूरज चव्हाणने देखील आपल्या आई-वडिलांना यावेळी फोन केला. सूरजचे आई-बाबा आता या जगात नाहीत. आई-आप्पा तुमची खूप आठवण येते, मी तुम्हाला खूप मिस करतो, तुम्ही मला सोडून का गेलात? असं म्हणत सूरज ढसाढसा रडला. "आई- आप्पा तुमची आठवण येतेय. तुम्ही मागचा पुढचा विचार का नाही केला. तुमच्या बाळाचा, माझा विचार का नाही केला? कोण त्याला सांभाळेल? कोण त्याच्याकडे बघेल? असं कसं काय तुम्ही मला सोडून गेलात? एकटं पडलंय तुमचं बाळ. आई कशी गं सोडून गेलीस तू मला. लय आठवण येतीय तुमची" असं सूरजने म्हटलं आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुख