Join us

गावातल्या पोराला तुम्ही...; ‘Bigg Boss Marathi 3’ जिंकल्यानंतर विशाल निकम भावुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 11:12 AM

Bigg Boss Marathi Season3 Winner Vishal Nikam : ‘बिग बॉस मराठी 3’चं विजेतेपद जिंकल्यानंतर विशाल निकमची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला

विशाल निकमवर (Vishal Nikam) सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. ‘बिग बॉस मराठी 3’ची (Bigg Boss Marathi 3) ट्रॉफी जिंकून विशालनं बाजी मारली. जय दुधाणे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसची चकाचकी ट्रॉफी आणि 20 लाखांचा धनादेश उंचावताना विशालच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. शोचा विजेता बनल्यानंतर विशालने सर्व मायबाप प्रेक्षकाचे आभार मानले आहेत. 

‘तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद, सर्व रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार.  आईशप्पथ सांगतो, तुम्ही होतात म्हणून मी इथवर आलो आणि आता ही ट्रॉफी माझ्या हातात आहे.  गावातून येणाऱ्या या पोराला तुम्ही आज महाराष्ट्राचा फेव्हरेट केलाय, बिग बॉस सिझन 3 चा विजेता बनवलाय. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. ही तर फक्त सुरुवात आहे,’ अशा शब्दांत विशालने आनंद व्यक्त केला. (Bigg Boss Marathi 3 Winner Vishal Nikam First reaction)‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या खास मुलाखतीत विशाल भरभरून बोलला. हे तुमच्यामुळे शक्य झालं. एका शब्दांत लयभारी... दुसऱ्या शब्दात कडक़.. एकूणच हा प्रवास लय भारी, एकदम कडक प्रवास होता... पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात पाऊल टाकलं त्यादिवशी एक स्वप्नं बघितलं होतं. एक नंबरवर नावाची पाटी लावली. 100 दिवस 1 नंबर बनायचेच प्रयत्न होते, असं विशाल म्हणाला.

एक वेगळा विशाल निकम बाहेर पडलाय...

पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरात गावाकडून गेलेला विशाल निकम होता... 100 दिवसानंतर एक वेगळा विशाल निकम बाहेर पडलायं. हे तुमच्यामुळे शक्य झालं... तुमच्याशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय, सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं, असं विशाल म्हणाला.

प्रत्येक क्षण अविस्मरणीय...बिग बॉसच्या घरातील 100 दिवसांतील कुठलाही एक क्षण अविस्मरणीय म्हणता येणार नाही. प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता. प्रत्येक टास्कमध्ये, प्रत्येक दिवशी मी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण  टिकिट टू फिनाले जिंकलो आणि पहिला फायनलिस्ट बनलो, तो क्षण खूप खास व अविस्मरणीय होता. हे 100 दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. हे पुरून उरणार आहेत, असं विशाल म्हणाला.

बिग बॉसने खूप काही दिलं...बिग बॉसच्या घरात 100 दिवस  राहिल्यानंतर स्वत:त काय बदल जाणवतोय? असं विचारलं असता तो म्हणाला, ‘पहिल्या दिवशी घरात गेलो त्यापेक्षा आत्मविश्वास खूप वाढलाय. विशाल निकमला नात्यांची जाण होती. पण कुठेतरी काम करताना याकडे दुर्लक्ष होत होतं,हे जाणवत होतं. आपल्यावर प्रेम करणारी लोक खूप महत्त्वाची आहेत, हे या घरात गेल्यानंतर समजलं, हा बदल खूप महत्त्वाचा मानतो. माणसांची किंमत खूप वाढलीय. होतो त्यापेक्षा अधिक खंबीर झालोय. बिग बॉसने आम्हाला घडवलंय. मी एकटाचं नाही तर आम्हा 17 जणांना बिग बॉसने खूप काही दिलंय.’

टॅग्स :बिग बॉस मराठी