अभिनेत्री निक्की तांबोळी हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. फिल्म इंडस्ट्रीत तिने स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. निक्की सध्या 'बिग बॉस मराठी' गाजवतेय. अगदी पहिल्या दिवसापासून निक्की बिग बॉसच्या घरावर राज्य करताना दिसून आली. संपुर्ण महाराष्ट्रात तिची चर्चा आहे. निक्कीनेच 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. अशातच आता निक्कीने तिचे लग्नाबद्दल काय प्लॅन आहेत, हे सुरजशी बोलताना सांगितले. तर सुरजनेही तो कसे लग्न करणार, याचा खुलासा केला.
नुकतंच 'UNSEEN UNDEKHA' मध्ये सूरज, निक्की आणि अभिजीत हे गप्पा मारताना पाहायला मिळाले. यावेळी अभिजीत सुरजला म्हणतो, "मी तुला बाहेर गेल्यावर पण कॉल करणार. जेव्हा तू लग्न करशील तेव्हा आम्हाला बोलव". तर सुरज म्हणतो, "मी बाहेर गेल्यावर सगळ्यांसोबत बोलणार. सगळ्यांना लग्नाला बोलवणार. मी छोटं लग्न करणार. फक्त देवीसमोर हार घालणार". यावर निक्की म्हणते, "पण हळद पाहिजे. तुला हळद लावू". यावर सूरज लाजून म्हणतो, "ते तर असणारचं ना. हळद, सुपारीचा खेळ असणार. त्याशिवाय मज्जा नाही येणार".
निक्की तू कधी लग्न करणार आहेस? तुझ वय पण झाले, असा प्रश्न सुरज निक्कीला करतो. त्यावर निक्की म्हणते, "मी जेव्हा लग्न करणार तेव्हा तुला बोलणार. वयाचा काही प्रश्न नाही येत. मला सध्या तरी माझ्या आई बाबांसोबत राहायचे आहे". मग तु घर जावई करणार का? असे सुरज तिला विचारतो. तर निक्की म्हणते, "मी लग्न केले तरी आई बाबांना घेऊन जाणार. जिथे कुठे पण जाणार, त्यांना घेऊन जाणार मग ते त्याच घरो असो वा माझं. मला मोठा परिवार आवडतो. मला सगळे सोबत पाहिजेत".