Join us

Bigg Boss Marathi updates: 'मला या घाणेरड्या गोष्टी शिकायच्या नाहीत'; सोनालीचे विकासला थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 4:16 PM

Bigg Boss Marathi updates: सोनाली विशालनंतर विकाससोबत वादविवाद करताना दिसणार आहे. मीनल आणि विकास, सोनालीला समजवत असतानाच सोनाली त्यांना उलट उत्तरं देण्यास सुरुवात करते. 

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi)  घरात सोनाली पाटील (sonali patil) आणि विशाल निकम (vishal nikam) ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. या दोघांचं आतापर्यंत घरातील अनेकांसोबत शाब्दिक वाद झाले आहेत. विशेष म्हणजे एकमेकांचे चांगले मित्र म्हणवणाऱ्या या जोडीचे आता आपआपसातदेखील वाद होतांना दिसत आहेत. यामध्येच आता सोनाली विशालनंतर विकाससोबत वादविवाद करताना दिसणार आहे. मीनल आणि विकास, सोनालीला समजवत असतानाच सोनाली त्यांना उलट उत्तरं देण्यास सुरुवात करते.  

काही कारणास्तव विकास आणि सोनालीमध्ये  वाद होणार आहे. त्यामुळे हा वाद मीनल सोडवण्याचा प्रयत्न करते. स्वत:ला त्रास करून नको घेऊस... तुझे मुद्दे त्याला सांग. पण आरामात बोल, तो पण आरामात सांगितलं की ऐकतो, असं मीनल सोनालीला सांगते. त्यावर  

"नाही गं हे बोलायला लागले की माझ्या डोक्याचं टेंपरचं गरम होतो. त्याला तसली सवय आहे... त्याला ना हजार लोकांना tackle कराची सवय आहे, हजार लोकांना गोल गोल फिरवायची सवय आहे. हे बघ आपल्याला तसंल काही येत नाही. साधी गोष्ट आहे, हे खटकलं", असं सोनाली विकासविषयी मीनलला सांगते. 

दरम्यान, सोनालीच्या बोलण्याची पद्धत पाहून विकास चिडतो आणि प्रत्युत्तर देतो.  "शिकून घे माझ्याकडून हे, चांगली गोष्ट आहे ना मला tackle करता येते ते... की भांडण, वचावचा करणे चांगले आहे?" , असा प्रश्न विकास विचारतो. त्यावर "मला या असल्या घाणेरड्या गोष्टी शिकायच्याचं नाहीयेत. मी शांतपणे इथे बसले होते... "असं सोनाली म्हणते. त्यामुळे आता या दोघांमध्ये नेमका कशामुळे वाद झालाय हे येत्या भागात प्रेक्षकांना समजणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीटिव्ही कलाकार