Join us

Bigg Boss Marathi : मीनलला कॅप्टन करण्यासाठी उत्कर्ष करणार मीराची फसवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 14:00 IST

Bigg Boss Marathi :आज मीनल आणि उत्कर्ष चर्चा करताना दिसणार आहेत.  यावेळी उत्कर्षने मीनलला पाठिंबा दिला असून 'तूच कॅप्टन होणार', असं म्हटलं आहे.

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात दर आठवड्याला जसे टास्क बदलत असतात. त्याच पद्धतीने घरातील प्रत्येक व्यक्तीचे स्वभावदेखील टास्कनंतर बदलतात. त्यामुळे आतापर्यंत घरातील अनेक सदस्यांचे खरे चेहरे किंवा गेम खेळण्याची पद्धत समोर आली आहे. यामध्येच आता मीनल (meenal) आणि उत्कर्ष (utkarsh)यांच्यातील नातं बदलताना दिसणार आहे. उत्कर्ष आणि जय यांना मीराला काही केल्या कॅप्टन होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे ते कसोशीने तसा प्रयत्न करत आहेत. याची कल्पनादेखील मीरा आली आहे. याच मुद्यावरुन आज मीनल आणि उत्कर्ष चर्चा करताना दिसणार आहेत.  विशेष म्हणजे यावेळी उत्कर्षने मीनलला पाठिंबा दिला असून तूच कॅप्टन होणार असं म्हटलं आहे.

'तू मला सपोर्ट कर. मी पण नक्कीच तुला सपोर्ट करेन आणि हे तुला माहित आहे', असं मीनल उत्कर्षला म्हणते. त्यावर 'तुला कॅप्टन व्हायचं आहे ना? मग तूच कॅप्टन होणार. सगळ्यांसमोर ओरडून मत देईन तुला. तिथून ते मीराला समोर आणणार', असं उत्कर्ष म्हणाला.

 Bigg Boss Marathi 3, Episodes, 4 Nov: "एक नंबरची खोटारडी आहे"; मीनलचा तृप्ती देसाईंवर आरोप 

पुढे तो म्हणतो, 'तुला माहिती आहे की नाही मला कल्पना नाही पण तुला कॅप्टन होऊ न देण्यासाठी तुझी टीम प्रयत्न करणार... दोन माणसं तरी नक्कीच तो प्रयत्न करणार. ते तुझ्याबरोबर असतील तर well an गुड. पण मला वाटतंय ते मीराला कॅप्टन करण्यासाठी टार्गेट करणार. पण, मला मीराला कॅप्टन करायचं नाहीये. मी आणि जय दादूससोबत बोलतो. जो मैं बोलता हूँ वो करता ही हूँ ! तुला माहिती आहे विकासला मी वाचवला जयचा फोटो लावून'. दरम्यान, या उत्कर्ष आणि मीनलमध्ये झालेल्या चर्चेत उत्कर्ष खरंच मीनलला साथ देणार की केवळ मुद्दाम तिची दिशाभूल करतोय हे येत्या टास्कमध्येच प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार